आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताच्या नावे राहिला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ५ गड्यांनी मात केली. भारताचा हा वानखेडे स्टेडियमवर १२ वर्षांनी पहिला विजय ठरला. तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना १९ मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होईल.
शुक्रवारी खेळवलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांवर ढेपाळला. प्रत्युत्तरात भारताने ३९.५ षटकांत ५ गडी गमावत विजय मिळवला. संघाची सुरुवात खराब झाली व संघाने अवघ्या ३९ धावांत ४ गडी गमावले. ईशान किशन (३), विराट कोहली (४), सूर्यकुमार यादव (०) आल्यापावली तंबूत परतले. शुभमन गिल (२०) देखील तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. लोकेश राहुल (७५*) व कर्णधार हार्दिक पांड्या (२५) या दोघांनी ४४ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने नाबाद ४५ धावांची खेळी केली. स्टार्कने ३ व स्टोइनिसने २ बळी घेतले.
तत्पूर्वी, प्रथम खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मो. सिराजने दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ट्रेव्हिस हेडला (५) बाद करत धक्का दिला. स्टीव्ह स्मिथ २२ व मिशेल मार्शने ८१ धावा करत संघाला सावरले. मार्शने सहावे अर्धशतक पूर्ण केले. तसेच लबुशेन (१५), जोश इंग्लिश (२६), ग्रीन (१२), मॅक्सवेल (८) व स्टोइनिस (५) लवकर परतले. शमी व सिराजने ३-३ गडी बाद केले.
हार्दिक पांड्याने केले प्रथमच वनडेमध्ये नेतृत्व
नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात उतरला. रोहित कौटुंबिक कारणामुळे पहिला वनडे खेळला नाही. हार्दिकने प्रथमच वनडेमध्ये देशाचे नेतृत्व केले. यापूर्वी त्याने टी-२० मध्ये ११ सामन्यांत नेतृत्व केले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ कर्णधार होता. वॉर्नरला अंतिम-११ मध्ये स्थान मिळाले नाही.
भारतीय संघ ऑगस्टमध्ये तीन सामन्याच्या टी-२० मालिका खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. क्रिकेट आयर्लंडने या दौऱ्याची अधिकृत माहिती दिली आहे. ही मालिका मत्नाहाइडमध्ये खेळवली जाईल. हा भारताचा सलग दुसऱ्या वर्षी आयर्लंड दौरा असेल. दोन्ही देशांतील मालिका येत्या १८ ते २३ ऑगस्टदरम्यान खेळवण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.