आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेश दौरा कोरोनामुळे रद्द होताना दिसत होता. न्यूझीलंडला पोहोचल्यानंतर संघाला अतिरिक्त ३ दिवस क्वॉरंटाइनमध्ये घालवावे लागले. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक रंगना हेराथ कोरोना पॉझिटिव्ह झाले. आठ खेळाडू विमानप्रवासात कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये पाठवले होते. या दौऱ्यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध मालिकेत बांगलादेशचा २-० ने पराभव झाला होता.
चालू दौऱ्यात प्रमुख खेळाडू शाकिब अल हसन व तमीम इक्बालदेखील संघासोबत नाहीत. एवढे सगळे होऊनही बांगलादेशने कसोटी क्रिकेट इतिहासात आपला सर्वात मोठा विजय मिळवला. संघाने सामन्याच्या अखेरच्या दिवशी बे ओव्हलच्या मैदानावर जागतिक कसोटी चॅम्पियन न्यूझीलंडला त्यांच्या घरात ८ गड्यांनी हरवले. हा SENA देशातील (द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) बांगलादेशचा पहिला कसोटी विजय ठरला.
संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व २२ सामने, १५ लढत डावांनी गमावले होते. याआधी संघाने परदेशात केवळ ५ कसोटी जिंकल्या होत्या. यात २ विंडीज, २ झिम्बाब्वे व १ कसोटी श्रीलंकेत जिंकली. २०११ पासून न्यूझीलंड घरच्या मैदानावर आशियाई संघाविरुद्ध पराभूत झाला नव्हता. तेव्हा त्यांना पाकिस्तानने हरवले होते.
चॅम्पियनशिपमध्ये बांगलादेश ५ व्या, न्यूझीलंड सातव्या स्थानी
सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशने न्यूझीलंडचा दुसरा डाव १६९ धावांत गुंडाळला. किवीचे चार फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. पाहुण्या संघाकडून इबादत हुसेनने ४६ धावा देत ६ गडी टिपले. बांगलादेशी वेगवान गोलंदाजाची कसोटीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. तस्किन अहमदनेही तीन बळी घेतले.
पहिल्या डावात १३० धावांची आघाडी घेत बांगलादेशला विजयासाठी ४० धावांचे लक्ष्य मिळाले होते. सलामीवीर शादमान इस्लाम आणि नजमुल हुसेन यांना गमावून संघाने विजय मिळवला. इबादत हुसेन सामनावीर ठरला. या मालिकेतील शेवटचा सामना ९ जानेवारीपासून ख्राइस्टचर्च येथे होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तालिकेत बांगलादेश पाचव्या व न्यूझीलंड सातव्या क्रमांकावर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.