आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs England 1st T20 LIVE | Rohit Sharma Virat Kohli | Narendra Modi Stadium Ahmedabad News | IND Vs Eng T20 Latest News Update

इंडिया vs इंग्लंड पहिला टी-20:इंग्लंडची भारतावर मात; कर्णधार कोहली सर्वाधिक 14 वेळा डक, तीन विकेट घेणारा जाेफ्रा आर्चर सामनावीर

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

कसाेटी मालिका पराभवातून सावरलेल्या पाहुण्या इंग्लंड संघाने शुक्रवारी सलामीच्या टी-२० सामन्यात यजमान टीम इंडियाला धूळ चारली. इंग्लंड संघाने सलामीचा सामना ८ गड्यांनी जिंकला. यासह इंग्लंड संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी हाेणार आहे. सलामीवीर जेसन राॅय (४९), डेव्हिड मलान (नाबाद २४) आणि जाॅनी बेयरस्ट्राेने (नाबाद २६) खेळीतून इंग्लंडचा विजय निश्चित केला. श्रेयस अय्यरच्या (६७) अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात १५.३ षटकांत विजयश्री खेचून आणली.

काेहलीचा भाेपळा : विराट काेहली हा करिअरमध्ये १४ वेळा डक (शुन्यावर बाद) हाेणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यात त्याने माजी कर्णधार गांगुलीला (१३) मागे टाकले.

राेहितला आराम देणे महागात
टीम इंडियाने सलामी सामन्यादरम्यान आपल्या सलामीवीर फलंदाज राेहित शर्माला विश्रांती दिली. मात्र, हाच निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला. यामुळे टीमची सलामीची जाेडी पुन्हा अपयशी ठरली. यातून भारतीय संघाला पराभवाला सामाेरे जावे लागले. यातून इंग्लंडने आघाडी घेतली.

बातम्या आणखी आहेत...