आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पहिला दिवसाचा खेळ संपण्यापर्यंत इंग्लंडने 3 विकेटवर 263 धावा केल्या आहेत. दिवसाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने डॉमनिक सिबलीला LBW केले. तो 87 धावा काढून बाद झाला. कर्णधार जो रुट 128 धावा काढून नाबाद पवेलियनमध्ये परतला. रूटने कसोटी करिअरची 20 वे शतक झळकावले. सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
यापुर्वी रूटने श्रीलंकेविरुद्ध मागच्या दोन कसोटी सामन्यात 1 डबल सेंचुरी (228 रन) आणि 1 शतक (186 रन)मारले होते. रूट 100 व्या कसोटीत शतक झळकावणारा जगातील 9वा आणि इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे.
सिबलीने कसोटी कारकिर्दीतील चौथी अर्धशतकी खेळी केली. हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक आहे. याआधी त्याने श्रीलंकेविरूद्ध गॉल कसोटीच्या दुसर्या डावात 56 धावा केल्या होत्या.
सामन्याच्या सुरुवातीला रोरी बर्न्स आणि सिबलीने इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. इंग्लिश टीमला पहिला झटका रोरी बर्न्सच्या रुपात मिळाला. रोरी 33 रन काढून आउट झाला. त्याला रविचंद्रन अश्विनने विकेटकीपर ऋषभ पंतकडे कॅच आउट केले.
चेपक स्टेडिअममध्ये खेळल्या जाणाऱ्या टेस्टमध्ये भारताचे 3 स्पिनर्स उतरले आहेत. यात रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर आणि शाहबाज नदीमचा समावेश आहे. तर इशांत शर्मा जखमेनंतर आता टीममध्ये परतला आहे. टॉस होण्यापूर्वी टीम इंडियाला झटका बसला. टीमचा ऑलराउंडर अक्षर पटेल गुडघ्यात मार लागल्याने टेस्टमधून बाहेर पडला आहे.
बुमराहला परदेशात सर्वाधिक कसोटी खेळल्यानंतर भारतात खेळण्याची संधी
जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच भारतात टेस्ट मॅच खेळत आहे. त्याने डेब्यूपासून आतापर्यंत 17 टेस्ट परदेशात खेळले आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये त्याने जवागल श्रीनाथचा विक्रम मोडला आहे. श्रीनाथने 12 टेस्ट परदेशात खेळल्यानंतर त्याला भारतात पहिला टेस्ट सामना खेळण्याची संधी मिळाली होती. आरपी सिंहने 11, सचिन तेंडुलकर आणि आशीष नेहराने 10-10 टेस्ट परदेशात खेळल्यानंतर भारतात टेस्ट खेळला होता.
रूटची 100वी कसोटी
ब्रिटिश कर्णधार जो रूटचा हा 100 वा टेस्ट सामना आहे. 100 वा टेस्ट खेळणारा तो इंग्लंडचा 15 वा क्रिकेटर आहे. रूट 100 टेस्ट खेळणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू आहे. रूटचे वय सध्या 30 वर्षे 37 दिवस आहे. सर्वात कमी वयात 100 टेस्ट खेळण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकच्या नावे आहे. त्याने 28 वर्षे 353 दिवस वय असताना 100 वा टेस्ट मॅच खेळला होता.
भारताचा प्लेइंग-11: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा.
इंग्लँडचा प्लेइंग-11: डॉमनिक सिबली, रोरी बर्न्स, डेनियल लॉरेंस, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), डॉम बेस, जैक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन.
372 दिवसानंतर सोबत खेळणार विराट आणि रोहित
या सामन्यात भारतीय संघातील दोन धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार आहेत. विराट आणि रोहित तब्बल 372 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सोबत दिसणार आहेत. या दोघांच्या असण्यामुळे भारतीय संघाच्या विजयाची आशा 22% ने वाढली आहे. विराट आणि रोहितने सोबत अखेरचा सामना 29 जानेवारी 2020 ला न्यूजीलँडविरोधात हॅमिल्टनमध्ये खेळला होता.
277 आंतरराष्ट्रीय सामने सोबत खेळले आहेत विराट आणि रोहित
विराट कोहली आणि रोहित शर्माने आतापर्यंत 277 इंटरनॅशनल सामने (तीन्ही फॉर्मेट) सोबत खेळले आहेत. या दरम्यान भारताने 170 सामन्यात विजय मिळवला आहे. विराट-रोहित असताना भारताच्या विजयाची टक्केवारी 61.37 टक्के असते. तर, दोघांशिवाय भारताच्या विजयाची टक्केवारी 39.19% राहते.
32 कसोटीत दोघे सोबत खेळले, 18 मध्ये भारताचा विजय
विराट कोहली आणि रोहित शर्माने आतापर्यंत 32 कसोटी सामने सोबत खेळले आहेत. यातील भारताने 18 सामने जिंकले आहेत, तर 8 मध्ये पराभव आणि 6 सामने ड्रॉ झाले. भारताने 457 कसोटी सामने विराट आणि रोहितशिवाय खेळले आहेत. यात भारताने 114 सामन्यात विजय मिळवला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.