आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नईमध्ये पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. इंग्डलने पहिल्या इनिंगमध्ये 578 धावा केल्या. मैदानात उतरलेल्या भारताने तिसऱ्या दिवसाअंती 6 विकेट गमावून 257 धावा केल्या आहेत. सध्या वॉशिंग्टन सुंदर 33 रन आणि रविचंद्रन अश्विन 8 रनावर नॉटआउट आहे. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
यापुर्वी ऋषभ पंत 91 रन (88 बॉल) आणि चेतेश्वर पुजारा 73 रन (143 बॉल) आउट झाले. या दोघांना डॉम बेसने आउट केले. बेसने 4 आणि जोफ्रा आर्चरने 2 विकेट घेतल्या. 5 विकेट गेल्या आहेत.
पुजारा पंतचे अर्धशतक
पुजाराने आपल्या करिअरचे 29वे अर्धशतक लगावले. त्याने पंतसोबत पाचव्या विकेटसाठी 145 बॉलवर 119 रनांची पार्टनरशिप केली. पंतनेही चांगली खेळी करत 40 बॉलवर अर्धशतक लगावले. दरम्यान, फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला 379 धावांची गरज आहे.
पंतच्या नावे अजून एक रेकॉर्ड
पंतने भारतातील आपल्या अखेरच्या तन इनिंगमध्ये 92, 92 आणि 70* रन काढल आहेत. ते भारतात पहिल्या 3 इनिंगमध्ये 50+ रन काढणारा दुसरा भारतीय खेळाडून बनला आहे. यापूर्वी विराट कोहलीने भारतात आपल्या पहिल्या 5 इनिंगमध्ये 52, 63, 58, 103 आणि 51* रन केले होते.
भारताची खराब सुरुवात
दरम्यान, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. 44 धावांवर भारताच्या दोन विकेट गेल्या. रोहित शर्माला 6 धावांवर जोफ्रा आर्चरने जोस बटलरकडे झेलबाद केले. तर, शुभमन गिलला 29 धावांवर आर्चरनेत जेम्स एंडरसनकडे झेलबाद केले. यानंतर, अजिंक्य रहाणे 1 आणि कर्णधार विराट कोहली 11 रन काढून आउट झाले. भारतात पहिल्यांदा खेळत असलेल्या डॉम बेसने दोन्ही विकेट घेतल्या.
अश्विन-बुमराहला 3-3 विकेट
इंग्लंडने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये 578 धावांचा डोंगर केला आहे. रविचंद्रन अश्विनने जेम्स एंडरसनला आउट करुन इंग्लंडची इनिंग संपवली. जेम्स 1 धाव काढून आउट झाला. भारताकडून अश्विन आणि बुमराहला 3-3 विकेट मिळाल्या. तर, शाहबाज नदीम आणि इशांत शर्माने 2-2 फलंदाजांना माघारी पाठवले.
यापुर्वी बुमराहने डॉम बेसला LBW आउट केले. डॉम 34 धावांवर आउठ झाला. बेस आणि लीचमध्ये 9 व्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली. इंग्लंडच्या संघाने 190.1 ओव्हरपर्यंत फलंदाजी केली. 2009 नंतर पहिल्यांदाच परदेशी संघाने भारतात 190+ ओव्हर फलंदाजी केली आहे. यापुर्वी 2009 मध्ये श्रीलंकाने अहमदाबादमध्ये 202.4 ओव्हर फलंदाजी केली होती.
अश्विनने सर्वाधिक ओव्हर टाकल्या
अश्विनने पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत 53 पेक्षा जास्त ओव्हर टाकल्या आहेत. या त्याच्याकडून एका इनिंगमध्ये केलेल्या सर्वाधिक ओव्हर आहेत. यापुर्वी त्याने 2011/12 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात एडिलेडमध्ये एका इनिंगमध्ये 53 ओव्हर टाकल्या होत्या.
दुसरा दिवस रूटच्या नावे
कसोटीचा दुसरा दिवस इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या नावे होता. भारतात द्विशतक झळकावणारा रूट मागील 10 वर्षीतील पहिला फलंदाज ठरला आहे. रूटने 377 बॉलमध्ये 218 धावा काढल्या. यापुर्वी नोव्हेंबर, 2010 मध्ये न्यूजीलंडच्या ब्रँडन मॅकुलमने हैदराबाद टेस्टमध्ये 225 धावा केल्या होत्या.
यापुर्वी रूट आणि सिबली यांनी तिसऱ्या विकेटवर उतरून 200 धावांची पार्टनरशिप केली. 2013 नंतर भारताच्या विरोधात ही सर्वात मोठा पार्टनरशिप स्कोअर आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलने रांची येथे खेळल्या गेलेल्या टेस्ट मॅचमध्ये 191 धावांची भागिदारी केली होती. जोनाथन ट्रॉट आणि इयान बेल केवळ याच जोडीने रूट आणि सिबली यांच्यापेक्षा अधिक धावांची पार्टनरशिप केली होती.
ट्रॉट आणि बेल यांनी डिसेंबर 2012 मध्ये चौथ्या विकेटवर उतरून 208 धावांची पार्टनरशिप केली होती. ही रूटची पहिली टेस्ट मॅच होती. सिबलीने टेस्ट करिअरची ही चौथी फिफ्टी लगावली होती. तत्पूर्वी श्रीलंकेच्या विरोधात गॉल टेस्टच्या दुसऱ्या डावात त्याने 56 धावा ठोकल्या होत्या. रूटने टेस्ट करिअरचे 20 वे शतक आता ठोकले आहे.
भारतचे प्लेइंग-11: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा.
इंग्लंडचे प्लेइंग-11: डॉमनिक सिबली, रोरी बर्न्स, डेनियल लॉरेंस, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), डॉम बेस, जैक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.