आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि इंग्लंडदरम्यान 5 टी-20 सीरीजमधील दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 7 गडी राखून लक्ष्य गाठले. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये ओपनर लोकेश राहुल शून्यावर सॅम करनच्या बॉलवर आउट झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि इशान किशनने 55 बॉलवर 94 रनांची पार्टनरशिप केली. ईशानने 32 बॉलमध्ये 56 धावा करत डेब्यू मॅचमध्ये अर्धशतक झळकावले. यानंतर ईशान आदिल राशिदच्या बॉलवर LBW झाला. तर, कर्णधार विराट कोहलीनेही शानदार अर्धशतक झळकावत 73 धावांची खेळी केली.
विराट कोहलीचे ओव्हरऑल क्रिकेटमध्ये 12 हजार रन पूर्ण
भारतीय कर्णधार विराट कोहली तिन्ही फॉर्मेट (टेस्ट, वनडे, टी-20) मध्ये 12 हजार धावा करणारा पहिला कर्णधार बनला आहे. जागतीकरित्या त्याचा तिसरा नंबर आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पोंटिंग 15,440 धावांसह टॉपवर आहे.
रॉय आणि मलानने इंग्लंडला सावरले
इंग्लंडने 6 विकेट गमावून 164 रन केले. ओपनर जेसन रॉयने सर्वाधिक 46 धावांची खेली केली. कर्णधार इयोन मोर्गनने 28 आणि डेविड मलानने 24 रन काढले. भारतीय स्पिनर वॉशिंगटन सुंदर आणि शार्दूल ठाकुरने 2-2 आणि भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने 1-1 विकेट घेतली.
दोन्ही संघ
इंडिया: लोकेश राहुल, ईशान किशन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दूल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल.
इंग्लंड: जेसन रॉय, जोस बटलर, डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, इयोन मोर्गन (कर्णधार), सैम करन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, टॉम करन और आदिल राशिद.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.