आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs England 4th T20 LIVE Score | Rohit Sharma Virat Kohli Ishan Kishan | Narendra Modi Stadium Ahmedabad News | IND Vs Eng Live Cricket Score Latest News Update

भारत vs इंग्लंड चौथा टी-20:भारताकडून इंग्लंडचा 8 धावांनी पराभव, सीरीजमध्ये 2-2 ने बरोबरी

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9 हजार टी-20 धावा करणारा रोहित दुसरा फलंदाज, यापूर्वी विराटच्या नावे रेकॉर्ड

इंग्लंड आणि भारतादरम्यान 5 टी-20 सीरिजचा चौथा सामना आज झाला. इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने इंग्लडंला 186 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात भारताकडून इंग्लडडचा 8 धावांनी पराभव झाला. भारताकडून शार्दुल ठाकुरने 3 , तर चाहर आणि पंड्याने दोन विकेट घेतल्या. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

रोहित, विराट फेल

यापूर्वी भारतीय ओपनर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली अपयशी ठरले. विराट 1 रनावर आउट झाला. विराटला आदिल रशीदने आउट केले. तर, रोहित 12 रनांवर जोफ्रा आर्चरच्या बॉलवर आउट झाला. राहुल 17 बॉलमध्ये 14 रन काढून आउट झाला.

रोहितच्या 9 हजार धावा पूर्ण

रोहित शर्माने आपल्या 11 धावा करताच, टी-20 फॉर्मेटमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठला.हा टप्पा गाठणारा रोहित दुसरा खेळाडून बनला आहे. यापूर्वी, कर्णधार विराट कोहलीने टी-20 फॉर्मेटमध्ये 287 सामन्यात 41.77 च्या सरासरीने 9,650 रन केले आहेत. तिसऱ्या नंबरवर सुरेश रैना आहे. त्याने 8,494 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघ

भारत: लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दूल ठाकुर, भुवनेश्वर कुमार आणि राहुल चाहर.

इंग्लंड: जेसन रॉय, जोस बटलर, डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, इयोन मोर्गन (कर्णधार), सैम करन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि आदिल राशिद.

बातम्या आणखी आहेत...