आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • India Vs England 4th Test LIVE | Rohit Sharma Virat Kohli | Narendra Modi Stadium Ahmedabad News | IND Vs Eng Test Day 1 Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौथी कसोटी:पहिल्या दिवशी 11 पैकी 8 विकेट स्पिनर्सने घेतल्या, इंग्लंडकडे 181 धावांची आघाडी

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरीजमध्ये टीम इंडिया 2-1 ने पुढे

भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथा आणि अखेरचा कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पहिल्या इनिंगमध्ये 205 धावा केल्या. 4 टेस्टच्या सीरीजमध्ये भारत 2-1 ने पुढे आहे.

सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारतीय टीमने पहिल्या इनिंगमध्ये 1 विकेट गमावून 24 रन केले आहेत. सध्या, रोहित शर्मा 8 रन आणि चेतेश्वर पुजारा 15 रनांवर नाबाद आहेत. पहिल्या दिवशी एकूण 11 विकेट पडल्या, यातील 8 विकेट स्पिनर्सने घेतल्या. टीम इंडियाची सुरुवात खराब राहिली. ओपनर शुभमन गिलने सलग 5 व्यांदा खराब कामगिरी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये गिल जेम्स एंडरसनच्या बॉलवर LBW झाला.

अक्षरने सलग 4 विकेट घेतल्या

इंग्लंडसाठी बेन स्टोक्सशिवाय डॅन लॉरेंसने 46 रन, ओली पोपने 29 आणि जॉनी बेयरयोने 28 रन केले. अक्षर पटेलने 4 विकेट घेतल्या. त्याच्यासोबत रविचंद्रन अश्विनने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या.

अक्षरने जॅक क्राउली, डॉम सिबली, डॅन लॉरेंस आणि डॉम बेसला आउट केले. सिराजने बेयरस्टो आणि जो रुटला, तर अश्विनने ओली पोप आणि बेन फोक्सला आउट केले. एक विकेट वॉशिंग्टन सुंदरने घेतली.

इंग्लंडची खराब सुरुवात

इंग्लंडने सुरुवातीच्या 5 ओव्हरमध्ये 10 रन केले. येथून विराट कोहलीने सहावी ओव्हर स्पिनर अक्षर पटेलकडे दिली. पटेलने ओपनर डॉम सिबलीला क्लीन बोल्ड केले. यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये पटेलने जॅक क्राउली (9) ला आउट केले.

दोन्ही संघ:

  • इंडिया: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज.
  • इंग्लंड: डॉम सिबली, जैक क्राउली, जॉनी बेयरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), डैन लॉरेंस, डॉम बेस, जैक लीच आणि जेम्स एंडरसन.
बातम्या आणखी आहेत...