आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • India Vs England News And Update; Virat Kohli And Rohit Sharma Will Play Together After 372 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

372 दिवसानंतर सोबत खेळणार विराट आणि रोहित:या दोन फलंदाजांमुळे 22% वाढते भारतीय संघाच्या विजयाची आशा

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 32 कसोटीत दोघे सोबत खेळले, 18 मध्ये भारताचा विजय

भारत-इंग्लँडदरम्यान होणाऱ्या चार कसोटी सामन्यातील पहिला सामना उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होत आहे. या सामन्यात भारतीय संघातील दोन धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार आहेत. विराट आणि रोहित तब्बल 372 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सोबत दिसणार आहेत. या दोघांच्या असण्यामुळे भारतीय संघाच्या विजयाची आशा 22% ने वाढली आहे. विराट आणि रोहितने सोबत अखेरचा सामना 29 जानेवारी 2020 ला न्यूजीलँडविरोधात हॅमिल्टनमध्ये खेळला होता.

277 आंतरराष्ट्रीय सामने सोबत खेळले आहेत विराट आणि रोहित

विराट कोहली आणि रोहित शर्माने आतापर्यंत 277 इंटरनॅशनल सामने (तीन्ही फॉर्मेट) सोबत खेळले आहेत. या दरम्यान भारताने 170 सामन्यात विजय मिळवला आहे. विराट-रोहित असताना भारताच्या विजयाची टक्केवारी 61.37 टक्के असते. तर, दोघांशिवाय भारताच्या विजयाची टक्केवारी 39.19% राहते.

32 कसोटीत दोघे सोबत खेळले, 18 मध्ये भारताचा विजय

विराट कोहली आणि रोहित शर्माने आतापर्यंत 32 कसोटी सामने सोबत खेळले आहेत. यातील भारताने 18 सामने जिंकले आहेत, तर 8 मध्ये पराभव आणि 6 सामने ड्रॉ झाले. भारताने 457 कसोटी सामने विराट आणि रोहितशिवाय खेळले आहेत. यात भारताने 114 सामन्यात विजय मिळवला आहे.

रोहितने भारतात 88 च्या सरासरीने धावा केल्या आहेत

रोहित शर्माने आतापर्यंत 34 कसोटी सामन्यात 45.40 च्या सरासरीने 2270 धावा केल्या आहेत. भारतीय मैदानात खेळताना रोहितची कामगिरी अधिक चांगली असते. रोहितने आपल्या करिअरचे सर्व 6 टेस्ट शतक भारतीय मैदानात मारले आहेत.

विराटने भारतात 13 शतक केले

भारतीय मैदानात विराटचा रेकॉर्डही चांगला आहे. विराटने ओव्हरऑल 87 कसोटीमध्ये 53.41 च्या सरासरीने 7318 धावा केल्या आहेत. यात त्याने 27 शतक लगावले आहेत. यातील 13 शतके भारतीय मैदानात लगावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...