आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि इंग्लंडदरम्यान 4 कसोटी सीरीजचा तिसरा सामना आज अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये सुरू आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 112 धावांवर ऑल आउट झाला. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 50+ धावा केल्या असून, दोन विकेटही गमावल्या आहेत. सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रीजवर आहेत. रोहितने 63 बॉलमध्ये अर्धशतक लगावले आहे. सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
एकदम मंद सुरुवातीनंतर भारताने सलग दोन ओव्हरमध्ये (15वी आणि 16वी) 2 विकेट गमावल्या. ओपनर शुभमन गिल 11 धावांवर जोफ्रा आर्चरच्या बॉलवर आउट झाला. यानंतर चेतेश्वर पुजाराला जॅक लीचने शून्यावर आउट केले.
इंग्लंडची खराब सुरुवात
इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लिश टीमच्या दोन विकेट 27 धावांवर पडल्या. 100वा कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने इंग्लंडला पहिला झटका दिला. ओपनर डॉम सिबली 1 रन काढून इशांतच्या बॉलवर स्लिपमध्ये रोहित शर्माकडे झेलबाद झाला.
अक्षरने 6 विकेट घेतल्या
स्पिनर अक्षर पटेलने 6 विकेट घेऊन इंग्लंडला मोठा धक्का दिला. पटेलने 7 व्या ओव्हरमध्ये इंग्लिश टीमची दुसरी विकेट घेतली. जॉनी बेयरस्टोला LBW केले. यानंतर अक्षरने जॅक क्राउलीला 53 रनांवर LBW केले. क्राउलीने करिअरमधील चौथे अर्धशतक लगावले. यानंतर पटेलने बेन स्टोक्स (6) लाही LBW केले. यानंतर अक्षरने जोफ्रा आर्चर आणि शेवटी स्टुअर्ट ब्रॉडला आउट केले.
अश्विनने 3 विकेट घेतल्या
स्पिनर रविचंद्रन अश्विनने 3 विकेट घेतल्या. अश्विनने इंग्लिश टीमला दुसरा झटका देताना कर्णधार जो रूटला 17 रनांवर LBW केले. यानंतर अश्विनने ओली पोप (1 रन) आणि जॅक लीचला आउट केले.
इंग्लंडमध्ये 4 तर भारतात 2 बदल
इंग्लंडमध्ये 4 बदल करण्यात आले आहेत. रोरी बर्न्स, डेन लॉरेंस, ओली स्टोन आणि मोइन अलीला प्लेइंग इलेवनमधून बाहेर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो आणि जॅक क्राउलीला संधी मिळाली आहे.
भारताने आपल्या प्लेइंग इलेवनमध्ये 2 बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी जसप्रीत बुमराहला आणि स्पिनर कुलदीप यादवऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे.
दोन्ही संघ:
इंडिया: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंड: डॉम सिबली, जैक क्राउली, जॉनी बेयरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जैक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.
3 प्रकारच्या बॉलसोबत डे-नाइट टेस्ट खेळणारा पहिला संघ इंग्लंड
इंग्लंड टेस्ट क्रिकेटमध्ये वापर होणाऱ्या 3 प्रकारचे बॉल SG, कूकाबुरा आणि ड्यूकसोबत डे-नाइट टेस्ट खेळणारा जगातील पहिला संघ बनला आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्टइंडीजने 2, तर ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, जिम्बाब्वे आणि साउथ आफ्रीकाने फक्त 1 प्रकारच्या बॉलसोबत सामना घेळला आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे भारतात सर्वात यशस्वी करणधार बनण्याची संधी आहे. कोहली आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने भारतात 21-21 टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. धोनीने भारतात 30 सामने खेळले. यातील 3 मध्ये विजय आणि 6 सामने ड्रॉ राहिले. तर, विराटच्या नेतृत्वात भारताने 28 टेस्ट खेळले. यातील दोनमध्ये पराभव आणि 5 सामने ड्रॉ झाले.
मोटेरा स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम नावाने ओळखला जाणार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.