आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs England Test Series News And Updates; The Second Test On A Black Clay Pitch; Bowlers Get Benefit; The Ball Will Bounce More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:दुसरी कसोटी काळ्या मातीच्या पिचवर; गोलंदाजांना फायदा; चेंडू अधिक उसळेल

चेन्नई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्यापासून चेपॉकवर दुसऱ्या कसोटीला सुरुवात

भारतीय संघ कसोटी मालिकेत पहिली सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी संघाने चेपॉक मैदानावर जवळपास ३ तास सराव केला. मालिकेत पुनरागमनासाठी भारताला सर्वप्रथम बदल करत संतुलित संघ बनवावा लागेल. शाहबाज नदीमचे बाहेर होणे निश्चित दिसत आहे. मात्र, त्याच्या जागी घेणार कोण कुलदीप यादव की अक्षर पटेल? कुलदीप अनेक दिवसांपासून संधीची वाट पाहत आहे. त्याने जानेवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनीत अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात पहिल्या डावात त्याने ५ बळी घेतले होते. दुसरीकडे, पायाच्या दुखापतीमुळे अक्षर पटेल पहिल्या कसोटीतून बाहेर झाला होता. त्याने नेट्समध्ये फलंदाजी व गोलंदाजी सुरू केली.

घरच्या मैदानावर नेहमी धावा करणारा भारतीय संघ पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. आता संघ दुसऱ्या सामन्यात पुनरागमनासाठी जोरदार तयारी करत आहे. चेन्नईतील पारंपरिक लाल मातीने बनवलेली खेळपट्टी भारतीय संघासाठी घातक ठरली. त्यावर गोलंदाजांनी आपली नाराजी व्यक्त केली. तयार करण्यात आलेल्या पाच खेळपट्टीपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या खेळपट्टीवर पहिला सामना झाला. पाचव्या खेळपट्टीवर गवत होते, ज्याचा वापर दुसऱ्या सामन्यासाठी होऊ शकतो. त्याच्या वरच्या भागावर काळी माती आहे. त्यावर पहिल्या सामन्यापेक्षा अधिक उसळी मिळवण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर, आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आपण चौथ्या स्थानावर आल्याची भारतीय संघाला जाणीव आहे. अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उर्वरित तीन सामन्यात चांगली कामगिरी करणे अवश्यक आहे.

टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा :

तीन सामन्याच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंडच्या १६ सदस्यीय संघात लियम लिविंगस्टोनचे पुनरागमन झाले. बटलर मालिकेसाठी भारतात येईल. १२ मार्चपासून मालिकेला सुरुवात होत आहे. यासाठी इंग्लंडचा संघ २६ फेब्रुवारीला भारतात दाखल होईल.

संघ : मोर्गन (कर्णधार), मोईन, जाेफ्रा आर्चर, जाॅनी बेयरस्टो, बिलिंग्स, जाेस बटलर, टॉम कॅरेन, सॅम करेन, जॉर्डन, लिविंगस्टोन, मलान, रशीद, रॉय, स्टोक्स, टॉपले, वुड.

प्रेक्षकांवर असेल खास सीसीटीव्हीची करडी नजर!

या सामन्याद्वारे गत वर्षी मार्चनंतर पहिल्यांदा भारतात प्रेक्षक स्टेडियममध्ये परततील. तामिळनाडू क्रिकेट संघटनेने सचिव रामासैमीने म्हटले की, दोन व्यक्ती दरम्यान एक आसन रिकामे असेल. सोशल डिस्टन्सिंगच्या पालनासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये केवळ मोबाइल शिवाय इतर कोणतीही गोष्ट घेऊन जाण्यास परवानगी नाही. स्टँडमध्ये चेंडू गेल्यावर मैदानी पंच त्याला सॅनिटायझर करेल. सर्व १७ गेटवर प्रेक्षकांचे तापमान तपासले जाईल.

बातम्या आणखी आहेत...