आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Germany LIVE Score; Olympics Hockey Update | Tokyo Olympics Men's Hockey Bronze Medal Latest News And Live Updates

भारतीय हॉकी टीमने घडवला इतिहास:ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांनंतर भारतीय हॉकीला मिळाले मेडल, जर्मनीला 5-4 ने पराभूत करून मिळवले ब्राँझ

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनी पुढे होती

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 41 वर्षाची प्रतिक्षा संपवत भारताने हॉकीमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये शेवटचे पदक 1980 मध्ये मॉस्को येथे मिळाले होते, याचे नेतृत्व वासुदेवन भास्करन यांनी केले होते. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय पुरुष संघाने 5-4 असा पराभव केला आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये 3-1 ने पिछाडीवर असताना जोरदार पुनरागमन करत 4 गोल केले. भारताकडून सिमरनजीत सिंगने 17व्या आणि 34 व्या, हार्दिक सिंह (27 व्या), हरमनप्रीत सिंग (29 व्या) आणि रुपिंदर पाल सिंग (31 व्या) यांनी मिनटांत गोल केले. मात्र, चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने दुसरा गोल केला आणि स्कोअर 5-4 केला.

मॅचमध्ये गोल केल्यानंतर भारतीय संघ...
मॅचमध्ये गोल केल्यानंतर भारतीय संघ...

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक पदक जिकल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचा अभिनंदन केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, हा एक एतिहासिक दिवस असून प्रत्येक भारतीयांच्या मनात कायम राहील. भारतीय संघाने देशातील तरुणांना नवी आशा दिली आहे. त्यामुळे भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान असल्याचे त्यांनी आपल्या ट्विट केले आहे.

पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनी पुढे होती
दरम्यान, दोन्ही संघात पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने आक्रमक खेळी करत आपले वर्चस्व कायम ठेवले. जर्मन संघाने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल नोंदवत आघाडी घेतली. यावेळी तैमूर ओरोजने मैदानी गोल केला असून पहिल्या क्वार्टरच्या समाप्तीपूर्वी त्याला पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारताने यावर शानदार बचाव करत जर्मनीची आघाडी 1-0 राखली.

गोल केल्यानंतर भारताचा रुपिंदर पाल सिंग.
गोल केल्यानंतर भारताचा रुपिंदर पाल सिंग.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने केला काउंटर अटॅक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने जर्मनीवर काउंटर अॅटक करत पुनरागमन केले. दरम्यान, दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीत सिंगने 17 व्या मिनिटाला गोल करत स्कोअर 1-1 अशी बरोबरीत आणला. त्यानंतर 24 व्या मिनिटाला व्हॅलेन आणि 25 व्या मिनिटाला फर्कने गोल करत स्कोअर 3-1 केला. भारताने अशीच आक्रमकता कायम ठेवत हार्दिक सिंहने 27 व्या आणि हरमनप्रीत सिंगने 29 व्या मिनिटाला स्कोअर 3-3 ने बरोबरीत आणला. हाफटाईमपर्यंत स्कोअर समान राहिला.

भारतीय पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांचा दुष्काळ संपवला.
भारतीय पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांचा दुष्काळ संपवला.

भारताचा तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये दबदबा
रुपिंदर सिंहने हाफ टाईमनंतर 31 व्या मिनटांत पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 4-3 आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या 3 मिनिटांनी सिमरनजीत सिंगने गोल करत आघाडी 5-3 अशी केली. दरम्यान, जर्मनी संघाने एक गोल घेत स्कोअर 5-4 असा केला. भारताने जर्मनीला 5-4 ने पराभव करत 41 वर्षांनतर पदक जिंकले.

बातम्या आणखी आहेत...