आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Great Britain Hockey LIVE Score Update; Women's Olympics Hockey Bronze Medal Match | Tokyo Olympics Hockey News And Live Updates

कांस्यपदकापासून वंचित भारतीय मुली:हॉकीत ब्रिटनने भारतावर केली 4-3 ने मात; आघाडी टिकवून ठेवण्यात भारतीय महिला संघाची झुंज अपयशी

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनने तिसऱ्यांदा जिंकले ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे पदक मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत ग्रेट ब्रिटनने भारतावर 4-3 ने मात करत पदक आपल्या नावावर केले आहे. दरम्यान, या चुरशीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार खेळी करत दुसऱ्या क्वार्टरमध्ये 3-2 अशी आघाडी घेतली. मात्र, ती आघाडी भारतीय महिला हॉकी संघाला कायम ठेवता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये 15 मिनिटांच्या आत 2 गोल करत ब्रिटनने सामना 4-3 ने जिंकला.

भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी
भारतीय महिला संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगले प्रदर्शन करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. संघाने यापूर्वी केवळ दोनदा ऑलिम्पिक खेळले आहे. विशेष म्हणजे 1980 मध्ये संघ टॉप 4 मध्ये पोहोचला होता. परंतु, त्यावेळी उपांत्य फेरीच स्वरुप नव्हते. 2012 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ 12 व्या स्थानी होते.

पराभवानंतर भारतीय खेळाडूला धीर देताना ब्रिटन खेळाडू.
पराभवानंतर भारतीय खेळाडूला धीर देताना ब्रिटन खेळाडू.

चार मिनटांत 3 गोल; गुरजीतचा डबल धमाका
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या भारतीय महिला संघाने पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करत 4 मिनटांत 3 गोल केले. यासह संघाने आघाडी घेतली होती. गुरजीतने आणि वंदना कटारियाने तीन गोल केले. दरम्यान, टीमने बचाव करत ब्रिटनला रोखण्याचा प्रयत्न केला होता.

भारताकडून वंदना कटारियाने गोल केला.
भारताकडून वंदना कटारियाने गोल केला.

पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनने आक्रमक खेळी केली
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ आक्रमक हॉकी खेळले. परंतु, सामन्याच्या दुसऱ्या मिनिटालाच ग्रेट ब्रिटनने पेनल्टी कॉर्नर मिळवला. भारताची गोलरक्षक सविता पुनियाने त्याचा बचाव केला. 10 व्या मिनिटाला ब्रिटनने दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळवला असता भारताने हा पेनल्टी कॉर्नरही हाणून पाडला. गोलरक्षक सविता पुनियाने पुन्हा एकदा शानदार बचाव केला.

बातम्या आणखी आहेत...