आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Hong Kong Match Today, Student With Delivery Driver In Hong Kong Team

आशिया कप टी-20:आज भारत आणि हाँगकाँग सामना, हाँगकाँग संघामध्ये डिलिव्हरी ड्रायव्हरसह विद्यार्थी

चंद्रेश नारायणन | मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हाँगकाँग संघात भारतासह पाक, बांगलादेशचे खेळाडू आहेत सहभागी

सलामीच्या दणदणीत विजयाने फाॅर्मात असलेला सात वेळचा चॅम्पियन भारतीय संघ आता आशिया कपमध्ये दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाला सलग दुसऱ्या विजयाची संधी आहे. भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना बुधवारी नवख्या हाँगकाँग टीमशी हाेणार आहे. डिलिव्हरी ड्रायव्हर आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हाँगकाँग संघ हा नवीन आहे. या टीमने 800 दिवसांपर्यंत क्रिकेटचा एकही सामना खेळला नाही. आयर्लंड संघाचे माजी कर्णधार ट्रेंट जाॅन्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली हाँगकाँग संघ मैदानावर टीम इंडियाच्या आव्हानाचा सामना करणार आहे.

‘हाँगकाँग टीमचे खेळाडू तब्बल 800दिवसांनंतर मैदानावर उतरणार आहेत. या माेठ्या ब्रेकमुळे हे सर्वच खेळाडू निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. मात्र, हीच निराशा दूर करण्यासाठी आम्ही झूमवरून सर्वांना खास प्रशिक्षण दिले. यामध्ये अनेक जण हे खाजगी क्षेत्रात काम करतात. मात्र, यातूनही ते आपल्या सरावात खंड पडू देत नाहीत. हाँगकाँगमध्ये माेजकीच तीन मैदाने आहेत. यामध्ये दाेन खाजगी आणि एक शासनाचे आहे, असेही प्रशिक्षक जाॅन्स्टन यांनी सांगितले.

यूएईला नमवून आशिया कपचे तिकीट
हाँगकाँग संघ नवखा आहे. मात्र, या टीमने पात्रता फेरीत सनसनाटी विजय संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या टीमने पात्रता फेरीत यजमान यूएईला धूळ चारली हाेती. यातून हाँगकाँग संघ आशिया कपसाठी पात्र ठरला. यूएई हा संघ जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी आहे. तसेच हाँगकाँग संघ क्रमवारीत 23 व्या स्थानावर आहे.

भारताचा किंचित शहा उपकर्णधारपदी
हाँगकाँग संघामध्ये खासकरून भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील खेळाडूंचा समावेश आहे. पाकचा निजाकत हा आता आशिया कपमध्ये हाँगकाँग संघाचे नेतृत्व करत आहे. तसेच भारताच्या किंचित शहाकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी साेपवण्यात आली. याच संघात आयुष शुक्ला या मूळ भारतीय खेळाडूचाही सहभाग आहे. भारताच्या 26 वर्षीय किंचितने आतापर्यंत 43 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या नावे 633 धावांची नाेंद आहे. तसेच 19 वर्षीय आयुष हा वेगवान गाेलंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...