आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत व न्यूझीलंड यांच्यातील ३ टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा विक्रमी फरकाने पराभव करत मालिका जिंकली. मालिका निर्णायक १-१ ने बरोबरीत असताना भारताने १६८ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. हा त्यांचा टी-२० इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात अनेक विक्रम झाले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ बाद २३४ धावा केल्या.
सामनावीर ठरलेल्या शुभमन गिलने (१२६*) शानदार शतक ठोकले. तो तिन्ही प्रकारांत शतक करणारा पाचवा फलंदाज बनला. तसेच त्याने भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याही उभारली. त्याला राहुल त्रिपाठीने (४४) साथ दिली. कर्णधार हार्दिक पटेल मालिकावीर ठरला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ डावाच्या दुसऱ्या षटकात ५ धावांत ३ गडी गमावल्यानंतर संपूर्ण संघ अवघ्या ६६ धावांवर गारद झाला.
धावांच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा टी-२० विजय
विजेता विरुद्ध अंतर वर्ष
श्रीलंका केनिया 172 धावा 2007
भारत न्यूझीलंड 168 धावा 2023
पाकिस्तान हाँगकाँग 155 धावा2022
{केवळ ५ भारतीयांची तिन्ही प्रकारांत शतके | रैना, रोहित, राहुल, कोहली व रैनानंतर गिल तिन्ही प्रकारांत शतक करणारा भारताचा पाचवा फलंदाज.
१९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा गौरव
सचिन तेंडुलकरने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून परतलेल्या भारतीय महिला संघाच्या खेळाडूंचा सन्मान केला. तेंडुलकरने शेफालीच्या नेतृत्वाखालील संघाला ५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी व सचिव जय शहा हेदेखील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.