आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Shrilanka | Marathi News | India Have Always Been Unbeaten In The Home Series Against Sri Lanka; Chance To Win 10th Consecutive T20 Match

भारत VS श्रीलंका:श्रीलंकेविरुद्ध मायदेशातील मालिकेत भारत नेहमीच अजेय; सलग 10 वा टी-20 सामना जिंकण्याची संधी

लखनऊ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेचा थरार आजपासून, सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ७ वाजेपासू
  • दीपक चहरनंतर सूर्यकुमारदेखील दुखापतीमुळे मालिकेबाहे

वेस्ट इंडीजविरुद्ध दुहेरी क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघाचा ताफा नवाबांचे शहर लखनऊ येथे पोहोचला आहे. आता भारतीय संघ शेजारी देश श्रीलंकेला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला असून त्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होईल. मालिकेतील पहिला सामना गुरूवारी अटलबिहारी वाजपेयी (इकाना) स्टेडियमवर खेळवला जाईल, जो या मैदानावरील भारताचा केवळ दुसरा टी-२० सामना असेल. यापूर्वी भारताने नोव्हेंबर २०१८ मध्ये वेस्ट इंडीजचा ७१ धावांनी पराभव केला होता. आता रेकॉर्ड पाहिल्यास श्रीलंकेचा संघ भारतात पाचवी टी-२० मालिका खेळत आहे, पण आतापर्यंत एकही मालिका ते जिंकू शकले नाहीत. भारताने चारपैकी ३ मालिका जिंकल्या आणि १ अनिर्णीत राहिली.

आता अधिक प्रयोग नाही, मीच सलामीला येणार : रोहित शर्मा
कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-२० मध्ये सलामीला उतरणार आहे. विंडीजविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात ईशान-सूर्यकुमारने डावाची सुरुवात केली होती. रोहितने म्हटले की, ‘प्रयोग केवळ त्या सामन्यापुरता होता, आता मीच सलामीला येणार.’ राहुलच्या अनुपस्थितीत ऋतुराज रोहितसोबत सलामी देऊ शकतो. कोहलीही नसल्याने ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. रवींद्र जडेजाही या सामन्यातून दोन महिन्यांनी पुनरागमन करेल. भावी कर्णधाराबद्दल विचारले असता रोहित म्हणाला, “बुमराह, पंत, राहुल हे तिघे परिपक्व आहेत. फक्त त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. माझी भूमिका त्यांना सर्व काही सांगण्याची नाही, तर त्यांना मार्गदर्शनासाठी आसपास राहण्याची गरज आहे.’ बायो बबलबाबत रोहित म्हणाला की, बबलमध्ये असताना त्याला खेळण्यात कोणतीही अडचण येत नाही. जेव्हा त्याला गरज असेल तेव्हाच तो सुटी घेईल. रोहित आणि संघ व्यवस्थापन टी-२० विश्वचषकापूर्वी चांगल्या खेळाडूंचा संघ तयार करण्यात व्यग्र आहेत. त्याने सांगितले की, ‘आम्ही संजू सॅमसनकडे विश्वचषकासाठी सदस्य म्हणून पाहत आहोत. तो परिस्थितीनुसार चांगला खेळतो.’

दीपक, सूर्यकुमार एनसीएत रिहॅब करणार, आयपीएलमध्ये खेळू शकतात
वेगवान गोलंदाज दीपक चहरनंतर फलंदाज सूर्यकुमार यादवही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात गोलंदाजीसाठी धाव घेत असताना दीपकच्या उजव्या मांडीचे स्नायू दुखावले होते. दुसरीकडे, सूर्यकुमारच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आहे. बीसीसीआयने त्याच्या पर्यायाची घोषणा केले नाही. दीपक व सूर्या आता एनसीएमध्ये जातील आणि तिथे ५-६ आठवडे पुनर्वसन करतील. आता दोघेही थेट आयपीएलमध्ये खेळण्याची अपेक्षा आहे.

खेळपट्टी अहवाल
या मैदानाची खेळपट्टी अनेकदा फलंदाजांना मदत करते. येथे बहुतांश सामन्यांमध्ये १६०+ स्कोअर झाले आहेत. या सामन्यातही ती तशीच राहण्याची अपेक्षा आहे. या मैदानाची सरासरी धावसंख्या १६६ आहे. येथे एकूण ४ टी-२० सामने झाले. यात प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला जिंकला.

बातम्या आणखी आहेत...