आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला २४० धावांचे लक्ष्य दिले. दिवसअखेर द. आफ्रिका २ बाद ११८ धावा करत विजयाच्या मार्गावर पोहोचला असून त्यांना १२२ धावांची गरज आहे. यजमानांचे ८ गडी शिल्लक आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर ढेपाळला. न्यू वंडरर्सच्या मैदानावर आतापर्यंत केवळ २ वेळा चौथ्या डावात एखादा संघ विजय मिळवू शकला. ऑस्ट्रेलियाने २०११ मध्ये ३१० व २००६ मध्ये २९४ धावांचे लक्ष्य गाठले होते.
भारताचे संघाचे २ प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा (५३) व अजिंक्य रहाणे (५८) जोडीने तिसऱ्या गड्यासाठी १११ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत आपल्या तिसऱ्या चेंडूवर रबाडाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शून्यावर बाद झाला. अश्विन व शार्दूल ठाकूरने १०० च्या स्ट्राइक रेटने धावा करत संघाला २०० चा आकडा गाठून दिला. अश्विन १६ व शार्दूल २८ धावांवर बाद झाले. यादरम्यान हनुमा विहारीने एक बाजू लावून धरली होती. त्याने दहाव्या गड्यासाठी सिराजसोबत २१ धावांची भागीदारी केली. भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर संपुष्टात आला. विहारी ४० धावांवर नाबाद राहिला. रबाडा, एनगिडी व जानसेनने ३-३ बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेच्या मार्करमने ३१ धावा केल्या. एल्गर ४६ व डुसेन ११ धावांवर खेळत आहे. अश्विन व शार्दूलने १-१ गडी बाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.