आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाने 2023 मधील पहिला सामना जिंकत आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने 5 वर्षांनंतर वर्षातील पहिला सामना जिंकला आहे. यापूर्वी 2017 मध्ये त्यांनी इंग्लंडचा 3 विकेट्सने पराभव केला होता.
या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात होणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 162 धावा केल्या. यानंतर पाहुण्या संघाचा डाव 160 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक 45 धावांचे योगदान दिले. तर सलामीवीर कुसल मेंडिसने 28 धावा जोडल्या.
शिवम मावीची कमाल
शिवम मावीने पदार्पणाचा सामना खेळत 4 विकेट घेतल्या. तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांना 2-2 यश मिळाले.
भारतीय फलंदाजांची कामगिरी
तत्पूर्वी, भारताकडून दीपक हुडा (41* धावा) आणि अक्षर पटेल (31* धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 68 धावांची भागीदारी केली. दोघांनी 35 चेंडूंचा सामना केला. या दोघांशिवाय सलामीवीर इशान किशन (37 धावा) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (29 धावा) यांनीही उपयुक्त खेळी खेळली. शुभमन गिल (7), सूर्यकुमार यादव (7) आणि संजू सॅमसन (5) फ्लॉप ठरले. श्रीलंकेच्या महेश टीक्षाना, चमिका करुणारत्ने, धनंजया डी सिल्वा, वनिंदू हसरंगा आणि दिलशान मदुशंका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
अशा पडल्या श्रीलंकेच्या विकेट
हुड्डा-दीपकने 35 चेंडूत 68 धावा केल्या, श्रीलंकेला 163 धावांचे लक्ष्य
श्रीलंकेकडून महेश टीक्षाना, चमिका करुणारत्ने, धनंजय डी सिल्वा, वनिंदू हसरंगा आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ईशानला सोडून...टॉप ऑर्डर कामी आली नाही
इशान वगळता भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप झाली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी गिल, सूर्या आणि सॅमसन यांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. 2022 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव 7 धावा करून बाद झाला. पदार्पण करणाऱ्या शुभमन गिललाही पॉवरप्लेमध्ये महिष टीक्षानाच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. त्याचवेळी संघात पुनरागमन करणारा संजू सॅमसन 5 चेंडूत 6 धावा करून बाद झाला.
दार्पण सामना खेळणारा शुभमन गिल 7 धावा करून बाद झाला. त्याला महेश टीक्षानाने एलबीडब्ल्यू केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव बाद झाला.
सामन्याच्या पहिल्याच षटकात 17 धावा
सामन्याच्या पहिल्याच षटकात 17 धावा झाल्या. भारताचा सलामीवीर इशान किशनने कसून राजिताच्या पहिल्याच षटकात 16 धावा वसूल केल्या. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. एक धाव अतिरिक्त आली.
महेश टीक्षानाच्या चेंडूवर शुभमन गिल एलबीडब्ल्यू झाला. त्याला केवळ 7 धावा करता आल्या. त्यानंतर सूर्यकुमार झेल देऊन सात धावांवर बाद झाला.
सर्वप्रथम या ग्राफिकद्वारे पाहुया मागील 10 वर्षांतील भारताच्या सामन्यांचे निकाल...
कर्णधार रोहित-विराट मैदानाबाहेर
टीम इंडिया रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल, जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा सारख्या सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळेल. टीमचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे. तर स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादवकडे टी-20 सीरिजसाठी भारताच्या उपकर्णधारपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
हार्दिकच्या नेतृत्वातील 5 सामन्यांत एकही पराभव नाही
हार्दिक पंड्याने 2022 मध्ये आयर्लंडविरोधातील 3 सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदा भारताचे नेतृत्व केले होते. त्यानंतर न्यूझीलंडविरोधातील टी-20 मालिकेतही त्याने कर्णधारपद भूषवले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 5 टी-20 सामने खेळलेत. यातील 4 सामन्यांत भारताचा विजय झाला. तर एक टाय झाला. या मालिकेनंतर 3 एक दिवसीय सामन्यांसाठीही हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार असेल. तर रोहित शर्मा कर्णधार असेल.
श्रीलंकेविरोधात रोहित टॉप स्कोरर
श्रीलंकेविरोधात टी-20 सामन्यांत भारताकडून रोहित शर्माने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने या सिंहली संघाविरोधात सर्वाधिक धावा कुटल्या. तो हा सामना खेळणार नाही. 19 सामन्यांत 144.21 च्या स्ट्राइक रेटने त्याच्या नावे 411 धावा आहेत. श्रीलंकेविरोधात रोहितने 35 चेंडूत शतकही ठोकले आहे.
श्रीलंकेविरोधात सर्वाधिक विकेट्स युजवेंद्र चहलने घेतलेत. चहलने 10 सामन्यांत 8..23 च्या सरासरीने 20 बळी घेतलेत. रवीचंद्रन अश्विन 14 बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीप यादवने 12 बळी घेतलेत.
कर्णधार शनाका भारताविरोधात टॉप स्कोरर
भारताविरोधात श्रीलंकेच्या कर्णधार दसून शनाकाने सर्वाधिक धावा काढल्यात. 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने 128.03 च्या स्ट्राइक रेटने 306 धावा केल्यात.
शनाकाने घेतले 12 बळी
शनाकाने भारताविरोधात 12 बळीही घेतलेत. टी-20 सामन्यांत भारताविरोधात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांत दुष्मंता चामिरा टॉपवर आहे. त्याने 15 सामन्यांत 16 बळी घेतलेत. तिसऱ्या क्रमांकावर वनिंदु हसरंगा असून, त्याने 10 बळी घेतलेत.
येथे पाहा पिच रिपोर्ट
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळल्या गेलेत. 5 वेला चेज करणारा व 2 वेळा प्रथम बॅटिंग करणारा संघ जिकला आहे. मुंबईची पिच हाय स्कोरिंग मानली जाते. रात्री दव पडल्यानंतर धावांचा पाठलाग करणे सोपे होते. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम बॅटिंग घेण्यास प्राधान्य देईल. या मैदानावर फर्स्ट इनिंगचा सरासरी स्कोर 195 व दुसऱ्या इनिंगचा सरासरी स्कोर 182 धावांचा आहे.
आता पाहा मुंबईतील हेड टू हेड
वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांत आतापर्यंत एक टी-20 सामना खेळण्यात आला आहे. त्यात भारताचा 5 गड्यांनी विजय झाला. भारताने येथे आतापर्यंत 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. त्यात प्रत्येकी 2 सामन्यांत जय व पराजय झाला आहे.
ओव्हरऑल दोन्ही संघांत आतापर्यंत 26 टी-20 सामने झालेत. त्यात भारताने 17 व श्रीलंकेने 8 सामने खेळलेत. एक सामना अनिर्णित राहिला. दुसरीकडे, भारतात दोन्ही संघांनी 14 टी-20 सामने खेळलेत. त्यात 12 मध्ये भारताचा, तर 2 मध्ये श्रीलंकेचा विजय झाला.
वेदर कंडीशन
3 जानेवारी रोजी मुंबईचे तापमान 21 ते 31 अंश सेल्सिअसमध्ये राहील. पाऊस होणार नाही. सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत तापमान 26 ते 24 डिग्रीपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. रात्रीला दव पडेल. त्यामुळे धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या संघाला फायदा होऊ शकतो. कारण, दवामुळे चेंडूवर चांगली ग्रिप बसणार नाही. त्यामुळे बॉलिंगवर चांगले नियंत्रण राहणार नाही.
दोन्ही संघांचे पॉसिबल प्लेइंग इलेव्हन...
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग व उमरान मलिक.
श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, भनुका राजपक्षे, धनंजय डी सिल्वा/चरिथ असालंका, वनिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसुन रजिथा/लहिरु कुमारा, दिलशान मदुशंका व महीश तीक्षणा.
पाहा दोन्ही संघांचे स्क्वॉड
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, ऋतुराज गायकवाड़, मुकेश कुमार, शिवम मावी व राहुल त्रिपाठी.
श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार) कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, भनुका राजपक्षे, धनंजय डी सिल्वा, चरिथ असालंका, वनिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसुन रजिथा, लहिरु कुमारा, दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन, महीश तीक्षणा, अशेन बंडारा, सदीरा समरविक्रमा, नुवान थुषारा व दुनिथ वेलाल्गे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.