आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Win By 59 Runs Against West Windies; The Series Was Also Done In His Name

दिव्य मराठी विशेषगोलंदाज चमकले:वेस्ट विंडीज विरोधात भारत 59 धावांनी विजयी ; मालिकाही आपल्या नावे केली

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत वेस्ट इंडिज दरम्यान टी-20 मालिका सुरु होती. आज फ्लोरिडा येथे या मालिकेचा अंतिम सामना खेळला गेला. यात भारताने प्रथम फलंदाजी करत यजमान वेस्ट इंडिजला 59 धावांनी मात दिली. कप्तान निकोलस पुरन याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भारतीय फंलदाजानी याजमानाचा हा निर्णय चुकीचा सिध्द करत विंडिज गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. प्रथम फलंदाजी करत भारताने 191 धावांचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे केले होते.त्यानंतर या धावसंख्याचा पाठलाग करताना संपुर्ण वेस्ट इंडिज संघ 132 धावांवर गारद झाला.भारताने ही मालिका 3-1 आपल्या नावे केली.

सामन्यात गोलंदाज चांगली कामगिरी करताने दिसले. धावसंख्येचे मोठे आव्हान समोर असताना सुरुवातीपासुनच भारतीय गोलंदाजानी विंडीडजच्या फलंदाजाना दबावात टाकले होते.त्यामुळेच आवेश खान या सामन्याचा मँन ऑफ द मँच ठरला. यावेळी तो म्हणला,या खेळानंतर त्याला चांगले वाटत आहे कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली नाही.परंतु या सामन्यात तो त्याच्या ताकदीवर टिकून राहिला आणि त्याचा योग्य परिणाम मिळाला.

बातम्या आणखी आहेत...