आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Win The Series; The Series Winner Will Be Decided Tomorrow! Indian Team Defeated By 82 Runs

मालिका बरोबरीत:चौथ्या टी-20 सामन्यात भारताची 82 धावांनी दक्षिण आफ्रिकेवर मात, उद्या निश्चित होणार मालिका विजेता

राजकोट11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर दिनेश कार्तिकने (५५) झंझावाती अर्धशतकी आणि आवेश खान (४/१८), युजवेंद्र चहलने (२/२१) शानदार खेळीतून यजमान टीम इंडियाला शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये विक्रमी विजय मिळवून दिला. भारताने मालिकेतील चौथ्या सामन्यात आफ्रिकेचा अवघ्या ८७ धावांवर धुव्वा उडवला.

भारताने १६.५ षटकांत ८२ धावांनी सामना जिंकला. यासह भारताने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. आता मालिकेतील निर्णायक शेवटचा पाचवा सामना उद्या रविवारी बंगळुरूत रंगणार आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या माेबदल्यात आफ्रिकेसमाेर विजयासाठी १७० धावांचे टार्गेट ठेवले होते. प्रत्युत्तरात आफ्रिका संघाला अवघ्या ८७ धावांत गाशा गुंडाळावा लागला. संघाकडून डुस्सेनने सर्वाधिक २० धावांची खेळी केली.

विक्रमी विजय

भारताने टी-२० मध्ये आफ्रिकेवर विक्रमी विजय संपादन केला. भारताचा हा माेठा विजय ठरला. यापुर्वी ४८ धावांच्या विजयाचा विक्रम नोंद होता.

१६ वर्षांत कार्तिकचे पहिले अर्धशतक

टीम इंडियाच्या दिनेश कार्तिकने १६ वर्षांच्या टी-२० करिअरमध्ये पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. त्याने २०३.७० च्या स्टाइक रेटने २७ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली.

आवेश खानचे चार बळी

भारताकडून आवेश खानने चार षटकांत १८ धावा देत ४ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...