आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया कपसाठी श्रेयस, दीपकला शेवटची संधी:भारत-विंडीज आज चाैथा टी-20 सामना; प्रक्षेपण रात्री 8.00 वाजेपासून

फाेर्ट लाॅडरहिल13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन विजयांनी फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता विंडीजवर मालिका विजय संपादन करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत व विंडीज यांच्यातील चाैथा टी-२० सामना शनिवारी रंगणार आहे. भारतीय संघ सध्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये २-१ ने आघाडीवर आहे. आता एका विजयाने टीम इंडियाला ही मालिका आपल्या नावे करण्याची संधी आहे. शनिवारपाठाेपाठ भारतीय संघ रविवारी मालिकेतील पाचवा व शेवटचा टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या श्रेयस अय्यर व दीपक हुडासाठी हे दाेन्ही सामने महत्त्वाचे आहेत. त्यांना याच दाेन्ही सामन्यांतील सर्वाेत्तम कामगिरीच्या बळावर आशिया कपसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित करण्याची शेवटची संधी आहे. २७ आॅगस्टपासून आशिया कपला सुरुवात हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...