आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Won 2 Medals On The Same Day For The First Time; Hope For 2 More Medals Today, News And Live Updates

निर्धार विजयाचा:भारताला प्रथमच एकाच दिवशी 2 पदके; आज आणखी 2 पदकांच्या संधी, हॉकी व 86 किलो कुस्तीत कांस्यची आशा

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रवीच्या पकडीतून सुटण्यासाठी नूर इस्लाम त्याला चावला... पण आम्ही त्याला माफ केले... - जगमिंदर सिंह, कोच

भारतीय मल्ल रवी दहियाने चौथे पदक निश्चित केले. तो ५७ किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचला. लढतीच्या शेवटच्या क्षणांत रवीच्या पकडीत जखडलेल्या कजाकिस्तानच्या नूर इस्लामने त्याच्या दंडाला चावा घेतला. वेदना होत असतानाही रवीने पकड सैल केली नाही आणि स्पर्धकाला चीत केले. यापूर्वी फक्त सुशीलकुमारच फायनल गाठू शकला होता. बुधवार भारतासाठी खास ठरला. कारण, देशाला आॅलिम्पिकमध्ये प्रथमच एका दिवसात दोन पदके मिळाली. रवीने कुस्तीत पदक पक्के केले. दुसरीकडे, सेमीफायनलमध्ये तुर्कीच्या बुसानेज सुरमनेलीकडून पराभूत झाल्याने बॉक्सर लवलिना बोरगोहेनला कांस्यपदक मिळाले. गुरुवारी रवी दहिया फायनल खेळेल. पुरुष हॉकी टीम व ८६ किलो कुस्तीत दीपक पूनिया कांस्यच्या लढतीसाठी उतरेल.

भास्कर विश्लेषण : रवी दबाव झुगारून आक्रमक खेळला, शेवटच्या क्षणी डबल लेग अटॅकने जोरदार मुसंडी मारली रवी दहिया सर्व सामने बचावात्मक नव्हे, आक्रमकरीत्या खेळला. प्रत्येक सामन्यात तो वेळ संपण्याआधीच जिंकला. रवीने पहिली लढत १३-२ व दुसरी १४-४ ने जिंकली. सेमीत कझाकिस्तानचा स्पर्धक नूर इस्लाम सनायेवने फिटले डाव खेळला. यामुळे रवी ७ गुणांनी पिछाडीवर पडला. त्याने रवीला आणखी एकदा फिरवले असते तर स्कोअर ११-२ असा झाला असता व रवी हरला असता. जोरदार बचावामुळे रवीला जीवदान मिळाले. रवीने मुसंडी मारण्यासाठी लावलेला डाव जबरदस्त होता. त्याने पहिल्या लेग अटॅकने २ गुण मिळवले. यानंतर लेगमध्ये आत घुसून पलटी मारत स्पर्धकाला चीत करून टाकले. रवीने फायनलमध्येही असाच खेळ दाखवावा. अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकाविरुद्ध रवी यापूर्वीही खेळलेला आहे. त्याने सर्वाेत्तम कामगिरी करावी.

कांस्यविजेती लवलिना...

  • आज आणखी २ पदकांच्या संधी, हॉकी व ८६ किलो कुस्तीत कांस्यची आशा
  • बॉक्सर लवलिनाचा उपांत्य फेरीत पराभव, कांस्यपदकावर समाधान
  • आघाडीवरील स्पर्धकाला चीत करून रविकुमार सुवर्णपदकाच्या शर्यतीत
  • उपांत्य फेरीत भारतीय मल्ल रवीच्या दंडाचा स्पर्धकाने घेतला चावा

महिला हॉकी संघ अर्जेंटिनाविरुद्ध पराभूत, आता कांस्यपदकाची आशा
सेमीत महिला हॉकी संघ वर्ल्ड नंबर-२ अर्जेंटिनाविरुद्ध २-१ ने पराभूत झाला. भारतीय संघ शुक्रवारी कांस्यसाठी ब्रिटनविरुद्ध मैदानात उतरेल.

फायनल गाठणारा नीरज चोप्रा भारताचा पहिला भालाफेकपटू
पात्रता फेरीत ८६.६ मी. थ्रोसह नीरज चोप्रा अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे. फायनल ७ ऑगस्टला आहे.

सुवर्ण हुकल्याने निराश, मात्र हे आठ वर्षांच्या त्यागाचे फळ आहे
बॉक्सर लवलिना सेमीत पराभूत झाली. कांस्यपदकावर ती म्हणाली, ‘सुवर्ण हुकल्याने निराश आहे, मात्र हे आठ वर्षांच्या त्यागाचे फळ आहे.’

बातम्या आणखी आहेत...