आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Won 20 Medals In 4 Olympics; There Are 11 Haryana's, Because They Are Ready From School

भारताचा ऑलिम्पिक प्रवास:भारताने 4 ऑलिम्पिकमध्ये 20 पदके जिंकली; यात 11 हरियाणाची, कारण-शाळेपासूनच तयारी

पानिपत/नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 सुवर्ण, 2 रौप्य, 4 कांस्य; 121 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी

टोकियो ऑलिम्पिक रविवारी संपले. भारताला एका सुवर्णासह ७ पदके मिळाली, जी १२१ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. परंतु अनेक प्रश्नही आहेत. १३१ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाला केवळ ७ पदके का? गेल्या २१ वर्षांत देशाने २० पदके जिंकली. यात ११ एकट्या हरियाणाने पटकावलीत. या वेळी ६ वैयक्तिक पदकांपैकी ३ हरियाणाच्या खेळाडूंनी जिंकली. हॉकीच्या पदकातही हरियाणाच्या खेळांडूचा वाटा आहे. १२७ खेळाडूंच्या पथकात हरियाणाचे ३० खेळाडू होते. शेवटी राज्य इतकी चांगली कामगिरी कशी करत आहे? ही आहेत उत्तरे.

हरियाणात खेळाडूंना असे घडवतात...शाळा-कॉलेज स्तरावरच लाखोंची रोख बक्षिसे, कोचचे प्रशिक्षणही विदेशात केले जाते
पाया
: हरियाणात क्रीडा नर्सरी आहेत. शाळा-कॉलेज स्तरावर राष्ट्रीय पदक विजेत्याला ६ लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस मिळते. अडीच कोटींची लोकसंख्या असलेल्या हरियाणात साईची २२ केंद्रे आहेत. २३ कोटी लोकसंख्येच्या यूपीत २० केंद्रे, ८ कोटींच्या मप्रत १६, एवढ्याच लोकसंख्येच्या राजस्थानमध्ये १०, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये फक्त ३-३ साई केंद्रे आहेत.

बजेट : हरियाणाचे मागील ३ वर्षांचे सरासरी क्रीडा बजेट ३०० कोटींपेक्षा जास्त आहे. यंदा ३९४ कोटी रु. राजस्थानमध्ये ते १०० कोटीच.

कोचिंग : हरियाणात आंतरराष्ट्रीय पदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या कोचलाही २० लाखांपर्यंतचे इन्सेंटिव्ह मिळते. खेळाडूच नव्हे, कोचलाही प्रशिक्षणासाठी विदेशात पाठवले जाते. मप्र, राजस्थान, गुजरात, बिहार, छत्तीसगडमध्ये अशी कुठलीही सुविधा नाही.

प्रोत्साहन : ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यास ६ कोटी, रौप्यसाठी ४ कोटी व कांस्यसाठी २.५ कोटी दिले जातात. तयारीसाठी १५ लाख रुपये मिळतात. राजस्थानमध्ये फक्त ५ लाख रुपये मिळतात.

- २००० च्या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने पदक जिंकले होते, तेव्हापासूनच हरियाणाने ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना घडवण्याची तयारी सुरू केली होती. हा त्याचाच परिणाम आहे.

एक्स्पर्ट व्ह्यू / इन्सेंटिव्ह जिंकल्यानंतर नव्हे, आधी जाहीर करा : जी. एस. संधू, भारतीय बॉक्सिंग संघाचे माजी कोच
खेळ गावांपर्यंत आणावेत. प्रत्येक केंद्रात यूथ, ज्युनियर, सीनियर अकॅडमी असावी. विभागीय व राज्य स्तरावर स्पर्धांची संख्या वाढवावी. केंद्र, फेडरेशन आयओए आणि राज्यांनी पुढील ऑलिम्पिक, आशियाई विजेतेपद, राष्ट्रकुल स्पर्धा आदींसाठी आतापासूनच इन्सेंटिव्हची घोषणा करावी. खेळाडूंना २-३ महिन्यांचा ब्रेक मिळावा, नंतर लगेच पुढील तयारी सुरू करावी.

16 दिवस सतत अव्वल चीनला 17 व्या दिवशी फक्त 1 सुवर्णपदकाने मागे टाकत
अमेरिकेने राखले वर्चस्व

महाशक्तीचे रहस्य महिलाशक्ती : अमेरिकी महिलांनी पुरुषांपेक्षा ८०% जास्त व चिनी महिलांनी ८४% जास्त पदके जिंकली.

एकापेक्षा जास्त पदक जिंकणारे बनले गेमचेंजर : अमेरिकेच्या २९ अॅथलिट्सनी ६७ पदके जिंकली. चीनच्या २९ अॅथलिट्सनी एकापेक्षा जास्त पदके जिंकली. परंतु त्यांचे एकूण मेडल ४१ झाले. म्हणजे अमेरिकेपेक्षा २६ कमी. अमेरिकी अॅथलिट्स २८ सुवर्ण, तर चीनचे अॅथलिट २३ सुवर्ण जिंकू शकले.

- १२५ वर्षांत अमेरिकेने सर्वाधिक २,६३६ पदक जिंकले. चीन ६३४ पदकांसह चौथ्या स्थानी आहे. भारत ३५ पदकांसह ५४ व्या स्थानी. एकूण १० सुवर्ण, यात ८ हॉकीचे आहेत.

- नीरजच्या सुवर्णाने भारत अॅथलेटिक्समध्ये प्रथमच १८ व्या स्थानी, ७ सुवर्णांसह अमेरिका टॉप, दुसऱ्या स्थानी इटली

बातम्या आणखी आहेत...