आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Won By 4 Wickets In The Last 11 Balls, India Beat Bangladesh By 5 Runs Under Duckworth Lewis Rule

टी-20 विश्वचषक:अखेरच्या 11 चेंडूंत 4 बळी घेत भारत विजयी, भारताने बांगलादेशला डकवर्थ लुईसच्या नियमाने 5 धावांनी हरवल

अॅडिलेड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोमहर्षक लढतीत भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या जोरावर बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. या विजयासह संघ गट-२ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पावसापूर्वी बांगलादेशने ७ षटकांत एकही विकेट न गमावता ६६ धावा केल्या होत्या, त्यापैकी एकट्या एकट्या लिटनच्या ५९ धावा होत्या. संघ ९.४२ च्या रन रेटने धावा करत होता आणि १० गडी शिल्लक होते. म्हणजे संघाला जिंकण्याची प्रत्येक संधी होती. परंतु नंतर पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. पाऊस थांबल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा बांगलादेशला १६ षटकांत १५१ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले, म्हणजे त्यांना ९ षटकांत ८५ धावा करायच्या होत्या.

सामना पुन्हा सुरू झाला व दुसऱ्याच चेंडूवर राहुलने डीप मिडविकेटवरून थेट थ्रोने लिटनला धावबाद केले. मात्र, बांगलादेशची धावगती कमी झाला नाही आणि संघाने ८-९ अशा सरासरीने सातत्यपूर्ण धावा केल्या. त्यानंतर अर्शदीप व हार्दिकने १२ व्या व १३ व्या षटकात जबरदस्त गोलंदाजी केली. १२ व्या षटकात अर्शदीपने अवघ्या २ धावांत २ बळी घेतले, तर पुढच्या षटकात हार्दिकला ७ धावांत २ यश मिळाले. बांगलादेशने ११ चेंडूत ४ गडी गमावले व भारताने पुनरागमन केले. बांगलादेशला १६ व्या षटकात २० धावांची गरज होती, तो १४ धावा करू शकला.

कोहलीचे २३ डावांत १३ वे अर्धशतक, त्याच्या ४ सामन्यात २२० धावा प्रथम खेळताना भारताने ६ बाद १८४ धावा काढल्या. रोहित २ धावांवर परतला. केएल राहुल (५०) व विराट कोहली (६४*) यांनी अर्धशतके झळकावली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ३७ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. कोहलीची ही विश्वचषकातील २३ वी खेळी होती, ज्यात त्याने १३ वे अर्धशतक झळकावले. त्याने सध्या ४ सामन्यांत २२० धावा केल्या आहेत.

विराट कोहलीच्या टी-२० विश्वकपमध्ये सर्वोच्च धावा खेळाडू देश धावा कोहली भारत 1065 जयवर्धने श्रीलंका 1016 गेल वेस्ट इंडीज 965 रोहित भारत 921 दिलशान श्रीलंका 897

डेटा स्टेट्स विराट कोहलीची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी {कोहली विश्वचषकात ३ वेळा पेक्षा अधिक वेळा ५० +धावा करणारा एकमेव खेळाडू. कोहलीच्या तिन्ही प्रकारात १९९ व्या वेळी ५०+ धावा. { भारताच्या बुधवारी ६ बाद १८४ धावा ही बांगलादेश विरुद्ध टी-२०मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. { कोहली १० व्या वेळी आयसीसीच्या मर्यादित षटकाच्या स्पर्धेत सामनावीर बनला. सचिनशी बरोबरी केली. {कोहलीच्या ऑस्ट्रेलियात ३३५० धावा पूर्ण. तो ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणारा भारतीय बनला. सचिनचा (३३००) विक्रम मोडला.

बातम्या आणखी आहेत...