आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Won By 48 Runs; Rituraj's First Half Century; 4 Victims Of Herschel; India Beat Africa After 7 Consecutive Defeats

तिसरा टी-20 सामना:सलग 7 पराभवानंतर भारताची आफ्रिकेवर 48 धावांनी मात; ऋतुराजचे पहिले अर्धशतक, हर्षलचे 4 बळी

विशाखापट्टणम11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या पर्पल कॅप विजेत्या युजवेंद्र चहल (३/२०) व युवा गोलंदाज हर्षल पटेलने (४/२५) शानदार गोलंदाजीतून यजमान टीम इंडियावरील मालिका पराभवाचे सावट यशस्वीपणे दूर केले. भारताने मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा ४८ धावांनी पराभव केला. यातून भारताने सलग सात पराभवानंतर आफ्रिकेवर मात केली. यासह भारताने घरच्या मैदानावरील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयाचे खाते उघडले. आता मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी राजकोटमध्ये हाेणार आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या माेबदल्यात आफ्रिकेसमाेर १८० धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात आफ्रिका संघाचा १९.१ षटकांत १३१ धावांत धुव्वा उडाला.

ऋतुराज-ईशानची विक्रमी भागीदारी:
पुण्याचा ऋतुराज गायकवाड (५७) आणि ईशान किशनने (५४) भारतीय संघाला तारण्यासाठी माेठी खेळी केली. त्यामुळे भारतीय सलामीवीरांच्या नावे पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५०+ धावांच्या भागीदारीची नॉंद करता आली. ऋतुराजने अर्धशतकी खेळी करून दमदार पुनरागमन केले. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० करिअरमधील पहिले अर्धशतक आपल्या नावे केले. याशिवाय ईशान किशनने आपला झंझावात कायम ठेवताना मालिकेतील दुसरे अर्धशतक आपल्या नावे केले. त्याने सलामी सामन्यात शानदार ७६ धावांची खेळी केली हाेती. आता तिसऱ्या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजीत प्रिटाेरियस चमकला.

ईशान किशनचे चौथे अर्धशतक
फाॅर्मात असलेला युवा फलंदाज ईशान किशनने आपला झं‌झावात कायम ठेवला. यातून त्याने तिसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरे केले. त्याचे हे करिअरमधील चौथे अर्धशतक ठरले. तसेच त्याचे मालिकेतील हे दुसरे अर्धशतक आहे. याशिवाय ताे आता २३ वर्षांखालील अर्धशतकवीरांच्या यादीत सहभागी झाला आहे. या यादीत ईशान किशन हा चौथ्या स्थानावर आहे. यापूर्वी या यादीत विराट कोहली, राेहित शर्मा आणि सुरेश रैनाचा समावेश आहे. या तिघांच्या नावे प्रत्येकी ४ अर्धशतकांची नॉंद आहे.

ऋतुराजचा झंझावात; नॉर्टेजेच्या षटकात पाच चौकार
पुण्याच्या ऋतुराजने झंझावाती अर्धशतकी खेळी केली. त्याने ३० चेंडूंत अर्धशतक साजरे केले. यादरम्यान त्याची गोलंदाज नॉर्टेजेच्या षटकातील फटकेबाजी लक्षवेधी ठरली. त्याने या षटकात पाच उत्तंुग चौकार खेचले. त्याने १६२.८५ च्या स्ट्राइक रेटने ३५ चेंंडूंत सात चौकार व दाेन षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला आता आपल्या नावे पहिल्या टी-२० अर्धशतकाची नॉंद करता आली.

हर्षल-चहलच्या गोलंदाजीने संघ विजयी
युवा गोलंदाज हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजीतून भारताची पराभवाची मालिका खंडीत केली. हर्षलने चार व चहलने ३ बळी घेतले. तसेच भुवनेश्वर व अक्षर पटेलला प्रत्येकी एक बळी घेता आला.

धावफलक, नाणेफेक द. आफ्रिका (गोलंदाजी) भारत धावा चेंडू ४ ६ ऋतुराज त्रि.गो. महाराज ५७ ३५ ०७ २ इशान झे.हेड्रिक्स गो. प्रिटाेरियस ५४ ३५ ०५ २ श्रेयस झे. नॉर्टेजे गो. शम्सी १४ ११ ०० २ ऋषभ झे.बावुमा गो. प्रिटाेरियस ०६ ०८ ०० ० हार्दिक पांड्या नाबाद ३१ २१ ०४ ० दिनेश कार्तिक झे.पार्नेल गो.रबाडा ०६ ०८ ०० ० अक्षर पटेल नाबाद ०५ ०२ ०१ ० अवांतर : ०६, एकूण : २० षटकांत ५ बाद १७९ धावा. गडी बाद क्रम : १-९७, २-१२८, ३-१३१, ४-१४३, ५-१५८ गोलंदाजी : कागिसाे रबाडा ४-०-३१-१, वायने पार्नेल ४-०-३२-०, अनरिच नॉर्टेजे २-०-२३-०, प्रिटाेरियस ४-०-२९-२, तबरीझ शम्सी ४-०-३६-१, केशव महाराज २-०-२४-१. दक्षिण आफ्रिका धावा चेंडू ४ ६ बावुमा झे. आवेश गो. अक्षर ०८ १० ०० ० हेड्रिक्स झे.चहल गो. हर्षल २३ २० ०२ १ प्रिटाेरियस झे.ऋषभ गो. चहल २० १६ ०२ १ डुस्सेन झे.ऋषभ गो. चहल ०१ ०४ ०० ० क्लासेन झे.अक्षर गो. चहल २९ २४ ०३ १ मिलर झे.ऋतुराज गो. हर्षल ०३ ०५ ०० ० वायने पार्नेल नाबाद २२ १८ ०२ ० रबाडा झे.चहल गो. हर्षल ०९ ०८ ०१ ० महाराज झे. कार्तिक गो.भुवनेश्वर ११ ०८ ०० १ अनरिच नॉर्टेजे धावबाद ०० ०१ ०० ० शम्सी झे.आवेश गो. हर्षल ०० ०१ ०० ० अवांतर : ०५, एकूण : १९.१ षटकांत सर्वबाद १३१ धावा. गडी बाद क्रम : १-२३, २-३८, ३-४०, ४-५७, ५-७१, ६-१००, ७-११३, ८-१२६, ९-१३१, १०-१३१. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-२१-१, आवेश खान ४-०-३५-०, अक्षर पटेल ४-०-२८-१, युजवेंद्र चहल ४-०-२०-३, हर्षल पटेल ३.१-०-२५-४.

बातम्या आणखी आहेत...