आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुलाखत :खेळाडूंवर परिणाम होणे स्वाभाविक आहे, त्यांनी प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहावे : विजेंदर

जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉक्सिंगचा ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगशी चर्चा

संजीव गर्ग 

बीजिंग ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग कोविड-१९ महामारीमुळे चिंतित आहे. त्याच्या मते, “खेळाडूंनी स्वत:ला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार ठेवायला हवे. आॅलिम्पिक, आयपीएल, जागतिक स्पर्धा, व्यावसायिक लढत होईल की नाही, या गोष्टी विसरून खेळाडूंनी फक्त स्वत:चा फिटनेस व खेळावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे.’ विजेंदरच्या मुलाखतीतील काही भाग....


बॉक्सिंग स्पर्श असणारा खेळ आहे. बाॅक्सरसाठी आगामी काळ कठीण असेल, खेळाडूंनी स्वत:ला कसे तयार करावे?

“जान है तो जहान है’. आज नाही, तर उद्या बाॅक्सिंग खेळायचेच आहे. ऑलिम्पिक आज नाही, तर उद्या होईलच. स्वत:ला तंदुरुस्त ठेवा, सराव सुरू ठेवा. औषध येईल किंवा न येईल, खेळाडू व सर्वसामान्य जनतेला या संसर्गासोबत जीवन जगणे शिकावे लागेल. घरात पंचिंग बॅग व पंचिंग पॅडसोबत सराव होऊ शकतो. मात्र, खेळाडूसोबत सराव करू शकला नाही, रिंगमध्ये लढू शकला नाहीत, तर कितीही सराव केला तरी त्याचा फायदा होणार नाही.


खेळाडूंसाठी सर्व काही केव्हा सामान्य होईल?

सध्या सर्व गोष्टी सामान्य होण्यासाठी वेळ लागेल. खेळाडूच नाही, तर सर्वसामान्यांमध्ये या महामारीची भीती निर्माण झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागेल.


तुम्ही सलग १२ व्यावसायिक लढती जिंकल्या. तुमच्या व्यावसायिक करिअरमध्ये ब्रेक लागला?

माझी व्यावसायिक लढत मे-जूनमध्ये होती. त्याच्या तयारीसाठी मी ब्रिटनमध्ये जाणार होतो. तेव्हा कोराेना आला. लॉकडाऊन १,२,३,४ झाले. आता हळूहळू गोष्टी अनलॉक होण्यास सुरुवात झाली. वाट पाहतोय. फिटनेस करतोय. त्याचे व्हिडिओ इतर गोष्टी टिपत आहेत.


२ महिन्यांचा लॉकडॉऊनचा वेळ कसा घालवला?

जेव्हा व्यावसायिक बॉक्सिंग करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून इतका वेळ कधी कुटुंबीयांना देऊ शकलो नाही. मुले अबीर, अमरीकसोबत गावात लहानपणीच्या आठवणी जाग्या करतोय.


तुमच्या दोन्ही मुलांना काेणत्या खेळाची आवड आहे, तुमच्यासारखे बॉक्सर बनवणार का?

मोठा मुलगा ६ व छोटा १ वर्षाचा आहे. सध्या त्यांच्या आवडीबद्दल माहिती नाही. मी त्यांच्यावर दबाव टाकणार नाही. त्यांना ज्या खेळात जायचे असेल जातील, नसेल तरी काही अडचण नाही.


विनाप्रेक्षक स्पर्धेत खेळाडूंवर परिणाम होईल?

खेळाडू गर्दीपासून दूर राहू शकत नाही. खेळाडू क्रीडाप्रेमींसमोर आपले कौशल्य दाखवू शकणार नाही, तर त्याचा काय उपयोग? आता पुढे काय होईल, त्याबाबत अधिकृत सूचना येतील. या कठीण काळात जो संयम राखेल, तो स्वत:ला वाचवेल. अंधारानंतर सकाळ निश्चित होईल.

0