आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय गुणवंत युवा फुटबाॅलपटूंची आता जागतिक स्तरावर वेगळी छाप पडत आहे. यातूनच हेच युवा खेळाडू सध्या इंग्लंडचे फुटबाॅल विश्व गाजवताना दिसत आहेत. त्यामुळेच त्यांची ही ठसा उमटवणारी किक सध्या जागतिक स्तरावर लक्षवेधी ठरत आहे. यामध्ये भारताचे दिलनकुमार मार्केंडेय, मायकेल चाेपडा, यान ढांडा हे युवा खेळाडू आघाडीवर आहेत. याशिवाय भारतीय महिला फुटबाॅलपटूही विदेशी क्लबकडून लीगमध्ये खेळत आहेत.
भारताचा दिलन मार्कंडेय हा टाॅटेनहॅमच्या २३ वर्षांखालील संघाचा आघाडीचा खेळाडू आहे. त्याच्या नावे या संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम नाेंद आहे. त्याची विंगरची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. याशिवाय त्याने प्रीमियर लीगमध्ये अॅस्टाेन व्हिला क्लबकडून मिडफील्डरची भूमिका बजावली आहे. लंडनमध्ये दिलनकुमारचा २० ऑगस्ट २००१ मध्ये जन्म झाला. याच ठिकाणी त्याने आपल्या फुटबाॅलच्या गुणवत्तेला चालना दिली. त्यामुळे त्याला युवा गटातून एबरडिन क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याला या क्लबने यंदा ब्लॅकबर्न राेव्हर्स संघाने लाेनवर घेतले. ताे २०२१-२२ टाॅटेनहॅम हाॅट्सपर संघातही सहभागी झाला हाेता. त्याने ऑक्टाेबर महिन्यात या क्लबकडून पदार्पण केले.
वडील आणि भारतीय चाहत्यांचे पाठबळ प्रेरणादायी : दिलन लंडनमध्ये जन्मलेल्या दिलनला वडील आणि भारतीय चाहत्यांकडून मिळालेले पाठबळ हे प्रेरणादायी ठरत आहे. ‘मला वडिलांनी फुटबाॅलमध्ये करिअर करण्यासाठी वेळाेवेळी पाठबळ दिले. त्यामुळेच मला हा पल्ला गाठता आला. त्यांनी वेळप्रसंगी धाक दाखवून मला सरावासाठी पाठवले. यामुळेच माझ्या कामगिरीचा दर्जा उंचावला. टाॅटेनहॅम संघाच्या निवड चाचणीसाठी जाताना मी कारमध्येच झाेपलाे हाेताे. त्यानंतर मी यात सहभागी हाेणार नसल्याचे सांगितले. िविध सामन्यांदरम्यान खेळताना भारतीय फुटबाॅल चाहते आवर्जून भेटतात. त्यांची ही भेट नेहमीच प्रेरणादायी ठरते, अशा शब्दांत दिलनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
किरा राॅय, रूप काैर, मिली गाजवत आहेत महिला फुटबाॅल भारताच्या युवा स्टार फुटबाॅलपटू सध्या इंग्लंडमधील मैदान गाजवत आहे. यामध्ये किरा राॅय, रूप काैर, मिली चंद्रमा यांची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. त्यांना इंग्लंडच्या स्थानिक महिला क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. २६ वर्षीय चंद्रमाने अल्पावधीत इंग्लंडच्या फुटबाॅलमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ती इंग्लंडमध्ये सर्वाेत्कृष्ट महिला फुटबाॅलपटूंपैकी एक आहे. तिला मँचेस्टर यु्नायटेडकडून खेळण्याची संधी मिळाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.