आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संजीव गर्ग
कोरोना व्हायरसनंतर खेळांतील सुरुवात हळूहळू केली पाहिजे. २०१२ लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता नारंगने म्हटले की, या वेळी खेळाडूंवर दबाव असेल. अशात त्याला मैदानावर येण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये. त्यांना भावनांचे संतुलन राखणे सोपे राहणार नाही, असे मत ऑलिम्पियन नेमबाज गगन नारंगने मांडले. काँटॅक्ट स्पोर्ट््सचे पुनरागमन कठीण आहे. कोरोना व्हायरसदरम्यान नारंग सतत खेळाडूंशी चर्चा करत आहे. तो गन फाॅर ग्लोरी नेमबाजी अकादमी देखील चालवतो.
१५ नेमबाजांना काेटा मिळाला, कुणाकडून पदकाची अपेक्षा आहे?
ऑलिम्पिकसाठी ज्या खेळाडूंनी पात्रता मिळवली, त्यात जास्तीत जास्त युवा आहेत. प्रत्येक खेळाडूूमध्ये पदक जिंकण्याची क्षमता आहे. आमच्या अकादमीत जवळपास सर्व युवा खेळाडू असून आम्ही २०२४ पॅरिस ऑलिम्पिकचे लक्ष्य ठेवून तयारी करतोय.
मंत्रालयाने स्टेडियम उघडण्याचा निर्णय घेऊन योग्य पाऊल उचलले का, वाट पाहायला हवी होती का?
स्टेडियम व स्पोर्ट््स कॉम्प्लेक्स वेगवेगळ्या नजरेतून पाहायला हवे. गेल्या चार दिवसांत ६ हजारांपेक्षा अधिक कोविड १९ ची प्रकरणे पुढे आली आहेत. त्यामुळे खेळाची सुरुवात हळूहळू करायला हवी. कोणत्या खेळाडूला साई केंद्रात येण्यासाठी दबाव टाकला नाही पाहिजे. देशातील विविध ठिकाणांवरून येणाऱ्या खेळाडूंबाबत खबरदारी घ्यायला हवी.
लॉकडाऊननंतर खेळाडू मैदानावर परतत आहेत, कोणत्या प्रकारचे खेळाचे स्वरूप बदलेल?
खेळात किती बदल होईल हे आताच सांगणे घाईचे ठरेल. मात्र, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरसारख्या वस्तूंची आता गरज आहे. कोविड १९ ची भीती कायम डोक्यात राहील. खेळाडूंना भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल, ते सोपे राहणार नाही. स्पर्श न होणाऱ्या खेळात अनेक गोष्टी सोप्या असतील. मात्र, स्पर्श होणाऱ्या खेळात खूप अडचणी येतील.
नेमबाजी स्पर्श न होणारा खेळ आहे. तरीदेखील राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू खेळतात, आयोजन कसे शक्य आहे?
आम्ही सध्या सराव करण्यावर लक्ष्य देतोय. सध्या आम्ही सरावाचे नियोजन करतोय, त्यानंतर स्पर्धेचा विचार करू. स्पर्धेबाबत आतापासून योजना बनवावी लागेल. कठीण काळात क्रीडा मंत्रालय व क्रीडा संघटनांनी खेळाडूंची मदत केली पाहिजे. ज्या काही सूचना जाहीर होतील, त्या खेळाडूंना वेळोवेळी द्यायला हव्या. खेळाडूंना तयारीसाठी निधी कमी पडायला नको. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचा दर्जा उंचावल्या जाईल. यातून पदके मिळतील.
ऑलिम्पिक वर्षासाठी स्थगित झाले. तयारी करत असलेल्या खेळाडूंसाठी हा काळ कसा आहे?
ऑलिम्पिक खेळाडूंसाठी हा काळ खूप निराश करणारा आहे. खेळाडूंना लॉकडाऊनमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. काही खेळाडू आयसोलेशनदरम्यान सरावात व्यग्र होते, मात्र प्रत्येक जण असे करू शकत नाही. जोपर्यंत ही महामारी कमी हाेत नाही, तोपर्यंत भविष्यातील गोष्टी सांगता येणार नाहीत. खेळाडूंना स्वत:च स्वत:ला प्रोत्साहित करावे लागेल, आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. त्यामुळे आपल्याला सध्या ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा करावी लागेल. त्यासाठी मेहनत गरजेची आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.