आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उबेर चषक:भारतीय संघाचा कोरियाकडून 0-5 ने पराभव, कोरियाविरुद्ध एकही विजय मिळवला नाही  बँकॉक

दक्षिण कोरिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग २ सामने जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाला उबेर कपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण कोरियासमोर संघाची खडतर कसोटी लागली, यात संघाने पाचही सामने गमावले. पीव्ही सिंधूचा एन. सेयांगने सलग गेममध्ये २१-१५, २१-१४ असा पराभव केला.

सिंधूचा सेयांगविरुद्धचा हा सलग पाचवा पराभव ठरला. आकर्षी कश्यपला किम ग्युनने २१-१०, २१-१० आणि अश्मिता चालिहाला सिम यूजीनने २१-१८, २१-१७ असे सलग गेममध्ये पराभूत केले. महिला दुहेरीत श्रुती-सिमरन जोडीला ली सोही-शिन सेउंगचान जोडीने २१-१३, २१-१२ ने नमवले, तर तनिषा-त्रिशा जोडीला किम हाय जेओंग-कोंग हिओंग जोडीने २१-१४, २१-११ ने हरवले. आता १२ मे रोजी भारताचा उपांत्यपूर्व फेरीत थायलंडशी सामना होईल.

बातम्या आणखी आहेत...