आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Women Team | Sport | Cricket | Marathi News | Mithali Richa's Century Partnership; India's Second Defeat; New Zealand Won By 3 Wickets

दुसरा वनडे:मिताली-ऋचाची शतकी भागीदारी; भारताचा दुसरा पराभव; न्यूझीलंड 3 गड्यांनी विजयी

क्वीन्सटाऊन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिताली राजची न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक ७ अर्धशतके; ठरली पहिली भारतीय कर्णधार
  • 61 वे अर्धशतक मितालीने वनडेत साजरी केले. गत १० डावांत सातवे अर्धशतक.
  • 18 वर्षे १४० दिवसीय ऋचाचे अर्धशतक साजरे. सर्वात युवा भारतीय यष्टीरक्षक.

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने (नाबाद ६६०) पुन्हा एकदा मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली. तिने वनडेत यजमान न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक ७ अर्धशतके साजरी केली. ही कामगिरी करणारी ती भारताची एकमेव महिला कर्णधार ठरली. मिताली व युवा फलंदाज ऋचाने (६५) पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. मात्र, भारतीय संघाला मालिकेतील दुसरा पराभव टाळता आला नाही. न्यूझीलंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतावर तीन गड्यांनी मात केली. न्यूझीलंडने विजयासह मालिकेत २-० ने आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २७० धावा काढल्या. भारताचा हा न्यूझीलंडविरुद्धचा सर्वात माेठा स्काेअर ठरला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ७ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.

मितालीने धाेनीला टाकले मागे : मिताली राजने न्यूझीलंडविरुद्ध सातवे अर्धशतक झळकावले. यासह तिच्या नावे विक्रमाची नाेंद झाली. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक अर्धशतके साजरी करणारी मिताली ही भारताची कर्णधार ठरली. यात तिने माजी कर्णधार धाेनी व अझरुद्दीनला (प्रत्येकी सहा) मागे टाकले आहे.

वनडेत विक्रमी ५ हजार धावा पूर्ण : मितालीने वनडे फाॅरमॅटमध्ये कर्णधाराच्या भूमिकेत सर्वाधिक ५ हजार धावांचा पल्ला गाठला. अशा प्रकारे वनडेत पाच हजार धावा पूर्ण करणारी मिताली ही जगातील पहिली खेळाडू ठरली.

बातम्या आणखी आहेत...