आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्फ:भारताची महिला गोल्फपटू दीक्षा डगर ठरली डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत चॅम्पियन

कॅक्सियास दो सुल10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची महिला गोल्फपटू दीक्षा डगर गुरुवारी ब्राझीलमध्ये आहोजित डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने गोल्फ प्रकारात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. यासह तिने आपल्या करिअरमध्ये या स्पर्धेत दुसरे पदक पटकावले. तिने यापूर्वी २०१७ मध्ये राैप्यपदकाची कमाई केली होती.

तिने आता अमेरिकेच्या एशलिन ग्रेसला मागे टाकत किताबाचा बहुमान पटकावला. दीक्षा ही या स्पर्धेत दोन पदके जिंकणारी भारताची पहिली महिला गोल्फपटू ठरली. तसेच जर्लिन-अभिनवने बॅडमिंटनच्या दुहेरीत गटात सुवर्णपदक पटकावले. भारताच्या या जाेडीने फायनलमध्ये अमेरिकन खेळाडूंचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...