आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Women's Hockey Team Beat Ghana 5 0; The Women's Cricket Team Lost

राष्ट्रकुल क्रीडा स्‍पर्धा:भारतीय महिला हाॅकी संघाचा घानाविरुद्ध 5-0 ने विजय; महिला क्रिकेट टीम पराभूत

बर्मिंगहॅम6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सलामीच्या सामन्याने राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली. या सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांची निराशा झाली. भारतीय महिला संघाला सलामी सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. दुसरीकडे भारताच्या महिला खेळाडूंनी हाॅकीच्या इव्हेंटमध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. सविता पुनियाच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय महिला हाॅकी संघाने सलामी सामन्यात घानावर 5-0 ने मात केली.

तसेच बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाने सलामी लढतीत पाकिस्तानचा 5-0 ने पराभव केला. पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने टी-20 फाॅरमॅटच्या सलामी सामन्यात 6 चेंडू राखून भारतावर 3 गड्यांनी मात केली. त्यामुळे 49 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट काढणाऱ्या भारताला पराभवाचा सामना कराव लागला. कर्णधार हरमनप्रीत काैर (52) आणि शेफाली वर्माच्या (48) शानदार खेळीतून भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 154 धावा काढल्या. प्रत्युत्तरात गार्डनरने (52) नाबाद अर्धशतकातून 19 षटकांत ऑस्ट्रेलियाचा सात गड्यांच्या माेबदल्यात विजय निश्चित केला. भारताचा दुसरा सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध हाेणार आहे.

दुसरी यशस्वी गाेलंदाज :
भारताकडून रेणुकाने सलामी सामन्यात लक्षवेधी खेळी केली. तिने चार बळी घेतले. अशा प्रकारे टी-20 मध्ये चार वा त्यापेक्षा अधिक बळी घेणारी रेणुका ही भारताची दुसरी वेगवान गाेलंदाज ठरली. यापूर्वी झुलनने हा पराक्रम गाजवला आहे.

भारताचा 5-0 ने विजय
गुरजित काैर (3, 39 वा मि.), नेहा गाेयल (28 वा मि.), संगीता कुमारी (36 वा मि.) आणि सलीमा टेटेने (56 वा मि.) आपल्या आक्रमक खेळीतून भारतीय महिला हाॅकी संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. टाेकियाे ऑलिम्पिकमधील चाैथ्या स्थानावरील भारतीय संघाने शुक्रवारी सलामी सामन्यात घानाचा पराभव केला. भारताने 5-0 ने सलामीचा सामना जिंकला.
आता घानाविरुद्ध भारतीय महिला संघाची लक्षवेधी कामगिरी ठरली. गुरजितने अवघ्या तीन मििनटांत भारताला आघाडी मिळवून दिली. हीच लय कायम ठेवत संगीता, नेहा व सलिमाने गाेल केले. यासह भारतीय महिला संघाने किताबाच्या आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. आता भारताचा स्पर्धेतील आपला दुसरा सामना आज वेल्स संघाविरुद्ध हाेणार आहे. भारतीय संघाला आता सलग दुसरा सामना जिंकण्याची संधी आहे.

आफ्रिकेवर 3-0 ने मात
गत चॅम्पियन मणिका बत्राच्या नेतृत्वात भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. भारतीय महिला संघाने शुक्रवारी सलामी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजयाची नोंद केली. भारताने 3-0 ने सलामी सामना जिंकला. यामध्ये मणिकासह श्रीजा अकुला, रिथचे माेलाचे याेगदान राहिले. श्रीजा व रिथने दुहेरीचा सामना जिंकून भारताला दमदार सुरुवात करून दिली. या जाेडीने लाएला-दानिशावर 11-7, 11-7, 11-5 ने मात केली. त्यापाठाेपाठ मणिकाने एकेरीच्या लढतीत मुसाफिकला 11-5, 11-3, 11-2 ने धूळ चारली. त्यानंतर श्रीजाने एकेरीत दानिशावर 11-5, 11-3, 11-6 ने मात केली.

स्विमिंग : श्रीहरी नटराज उपांत्य फेरीत
भारताच्या सुपरस्टार जलतरणपटू श्रीहरी नटराजने पदकाचा आपला दावा मजबूत केला. त्याने पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्राेकची उपांत्य फेरी गाठली. त्याने 54.68 सेकंदांत निश्चित अंतर गाठले. यासह हा 21 वर्षीय श्रीहरी हिटमध्ये तिसरा वेगवान स्विमर ठरला. दरम्यान, भारताच्या अनुभवी जलतरणपटू साजन प्रकाश आणि कुशाग्र रावतला अपयशाचा सामना करावा लागला. प्रकाशने 50 मीटर बटरफ्लायच्या हिटमध्ये आठवे स्थान गाठले. तसेच कुशाग्र हा 400 मीटर फ्रीस्टाइलमध्ये हिटमध्ये दहाव्या स्थानी राहिला. आता प्रकाश 100 व 200 मीटर बटरफ्लायमध्ये आपले काैशल्य पणास लावणार आहे.

सायकलिंग : संघ पाचव्या स्थानावर
भारतीय पुरुष सायकलिंग संघातील राेनाल्डाे व डेव्हिड बेकहॅमचे टीम स्प्रिंट इव्हेंटमधील कांस्य हुकले. 0.206 सेकंदाने पिछाडीवर राहिल्याने भारताला या गटात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या गटात ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सुवर्णपदकासाठी झंुज रंगणार आहे. पुरुषपाठाेपाठ भारताच्या महिला संघाचीही निराशा झाली. महिला संघ टीम स्प्रिंटमध्ये सातव्या स्थानी राहिला. या टीमला सुमार खेळीचा माेठा फटका बसला.

अ‍ॅलेक्सने जिंकले सुवर्णपदक
अ‍ॅलेक्सने आपल्या घरच्या मैदानावर सर्वाेत्तम वेळ नोंदवत यजमान इंग्लंडला पहिल्या सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. त्याने पुरुषांच्या ट्रायथलाॅन इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. या गटात भारताचा आदर्श 30 व्या आणि विश्वनाथ यादव 33 व्या स्थानावर राहिला. या गटात जगातील नंबर वन आणि ऑलिम्पिक राैप्यपदक विजेत्या हेडेन विल्डेने दुसरे स्थान गाठले. तसेच आॅस्ट्रेलियाचा मॅथ्यू कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

बातम्या आणखी आहेत...