आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Women's Team Enters Semifinals, India Beat Germany 2 1 In Second Match |Marathi News

हॉकी विश्वचषक:भारतीय महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, दुसऱ्या सामन्यात भारताने जर्मनीचा 2-1 ने पराभव केला, संघाचा सलग दुसरा विजय

पोचफ्स्ट्रुम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला हॉकी संघाने कनिष्ठ विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात माजी विजेत्या जर्मनीचा २-१ असा पराभव केला. संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. या विजयासह भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळवणारा दुसरा संघ ठरला. यापूर्वी इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. हाफ टाइमपर्यंत भारताने जर्मनीविरुद्ध २-० अशी आघाडी घेतली होती. भारताच्या लालरेसियामीने दुसऱ्या मिनिटाला आणि मुमताज खानने २५ व्या मिनिटाला गाेल केला. दुसरीकडे, जर्मनीच्या बी. जूलेने ५७ व्या मिनिटाला संघासाठी एकमेव गोल केला. भारत लीगच्या अखेरच्या सामन्यात ५ एप्रिल रोजी मलेशिया संघाशी भिडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...