आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Women's Team Starts The New Year With A Bang; Will Participate In The Tri series In Africa

क्रिकेट:भारतीय महिला संघाची दाैऱ्याने नव्या वर्षाची सुरुवात; आफ्रिकेतील तिरंगी मालिकेमध्ये हाेणार सहभागी

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १९ जानेवारीपासून मालिका; विंडीज संघही सहभागी

भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय दाैऱ्याने पुढच्या नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. भारताचा महिला संघ १९ जानेवारीपासून आफ्रिकेत सुरू हाेणाऱ्या तिरंगी मालिकेत सहभागी हाेत आहे. यासाठी भारतीय महिला संघ पहिल्याच आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना हाेईल. ही मालिका १९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान दक्षिण आफ्रिकेत आयाेजित करण्यात आली. यादरम्यान मालिकेमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेसह भारत आणि विंडीजच्या महिला संघाचा समावेश आहे. या मालिकेच्या माध्यमातून भारतीय महिला संघाला पुढच्या वर्षी हाेणाऱ्या टी-२० विश्वचषकाची तयारी करण्याची माेठी संधी आहे. त्यामुळेच ही तिरंगी मालिका महत्वाची मानली जात आहे. यादरम्यान भारताच्या महिला संघाचा मालिकेत सर्वाेत्तम कामगिरी करण्यावर भर असेल. मालिकेचा सलामी सामना १९ जानेवारी राेजी ईस्ट लंडनमध्ये हाेणार आहे. यादरम्यान भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका संघ समाेरासमाेर असतील.

तिंरगी मालिकेचे वेळापत्रक १९ जाने. द. आफ्रिका विरुध्‍द भारत २१ जाने. द. आफ्रिका विरुध्‍द वेस्ट इंडीज २३ जाने. भारत विरुध्‍द वेस्ट इंडीज २५ जाने. द.आफ्रिका विरुध्‍द वेस्ट इंडीज २८ जाने. द. आफ्रिका विरुध्‍द भारत ३० जाने. भारत विरुध्‍द वेस्ट इंडीज २ फेब्रुवारी अंतिम सामना

बातम्या आणखी आहेत...