आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उबेर चषक:भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात : थायलंडविरुद्ध पराभव

बँकॉकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाला उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. भारतीय संघाला गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. थायलंड संघाने भारतावर ३-० ने रोमहर्षक विजयाची नाेंद केली. थायलंडच्या रत्नाचाेकने एकेरीच्या लढतीत भारताच्या सिंधूला पराभूत केले. तिने १८-२१, २१-१७, २१-१२ ने सामना जिंकला. यासाठी तिला तीन गेमपर्यंत शर्थीची झंुज द्यावी लागली. त्यानतर कितिथराकुल-प्राजाेंगाईने दुहेरीच्या लढतीत भारताच्या श्रृती मिश्रा व सिमरनचा पराभव केला. थायलंडच्या जाेडीने २१-१६, २१-१३ ने एकतर्फी विजय संपादन केला. पाेर्नपावीने एकेरीच्या लढतीत आकर्षी कश्यपला २१-१६, २१-११ ने धूळ चारली.