आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा:भारताच्या बॉक्सर हुसामुद्दीन, दीपकने पटकावले कांस्यपदक; भारताच्या नावे दोन पदके

दिव्य मराठी नेटवर्क | ताश्कंद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या बॉक्सर दीपक भोरिया (५१ कि.) अाणि मोहम्मद हुसामुद्दीनने (५७ कि.) शुक्रवारी जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये पदकाचा बहुमान पटकावला. हे दाेघेही अापापल्या वजन गटामध्ये कांस्यपदकाचे मानकरी ठरले. यामुळे भारताच्या नावे दाेन पदकांची नाेंद झाली अाहे. या दाेन्ही खेळाडूंची स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली.

दीपकने अापल्या ५१ किलाे वजन गटाची उपांत्य फेरी गाठली हाेती. यादरम्यान त्याला लढतीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. फ्रान्सच्या बिलाल बेन्नामाने सरस खेळीतून उपांत्य सामन्यात भारताच्या दीपकचा पराभव केला. त्याने ४-३ ने सामना जिंकून अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे भारताच्या हुसामुद्दीनला गंभीर दुखापतीमुळे उपांत्य सामन्यातून माघार घ्यावी लागली. यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली.