आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 आज:भारताची मालिकेत बराेबरीची मदार वेगवान गाेलंदाजांवर!

नागपूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या पराभवातून सावरलेला भारतीय संघ आता पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध टी-२० मालिकेत बराेबरी साधण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. यादरम्यान भारतीय संघाच्या विजयाची मदार ही वेगवान गाेलंदाजावर आहे. भारतीय संघाला सलामीच्या माेहाली येथील सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे टीम इंडिया सध्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. सलामीला भारतीय संघाला सुमार गाेलंदाजीचा माेठा फटका बसला. त्यामुळे डेथ आेव्हरमध्ये स्पेशालिस्टची उणीव भरून काढण्यासाठी जसप्रीत बुमराहला संधी देण्यात येणार आहे. दुखापतीतून सावरलेल्या बुमराहला सलामीच्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र, आता त्याला उमेश यादवच्या जागी संघात संधी मिळणार आहे. उमेश यादवला आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यादरम्यान बाहेर बसावे लागणार आहे. त्याने सलामी सामन्यात दाेन बळी घेतले हाेते.

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-२० आज; प्रक्षेपण सायं. ७.०० वा.

सलामीच्या सामन्यात हर्षल पटेल महागडा गाेलंदाज ठरला. त्यामुळे टीमला इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. नागपुरात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयाचा दावेदार

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना आतापर्यंत नागपूरच्या व्हीसीए मैदानावर विजयी पताका फडकवता आली आहे. त्यामुळे या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना १२ पैकी ९ टी-२० सामन्यांत संघांनी विजयाची नाेंद केली. तसेच प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना फक्त तीन वेळा विजय सपंादन करता आला. यजमान भारतीय संघाने या मैदानावर चारपैकी दाेन टी-२० सामन्यांत विजय मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...