आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India's Draw In The Series Depends On Fast Bowlers! India Australia 2nd T20 Today; Broadcast Evening 7.00 Hrs.

भारत-ऑस्ट्रेलिया आज दुसरा टी-20 सामना:भारताची मालिकेत बराेबरीची मदार वेगवान गाेलंदाजांवर!

नागपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या पराभवातून सावरलेला भारतीय संघ आता पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध टी-२० मालिकेत बराेबरी साधण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. यादरम्यान भारतीय संघाच्या विजयाची मदार ही वेगवान गाेलंदाजावर आहे. भारतीय संघाला सलामीच्या माेहाली येथील सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे टीम इंडिया सध्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. सलामीला भारतीय संघाला सुमार गाेलंदाजीचा माेठा फटका बसला. त्यामुळे आता डेथ आेव्हरमध्ये स्पेशालिस्टची उणीव भरून काढण्यासाठी जसप्रीत बुमराहला संधी देण्यात येणार आहे. दुखापतीतून सावरलेल्या बुमराहला सलामीच्या सामन्यात संधी मिळाली नव्हती.

नागपुरात उमेश यादवला विश्रांती
उमेश यादवला आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यादरम्यान बाहेर बसावे लागणार आहे. त्याने सलामी सामन्यात दाेन बळी घेतले हाेते

बातम्या आणखी आहेत...