आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India's First Match In The Nations Cup Is Against Canada, In Spain From December 11 To 17

हॉकी:नेशन्स कपमध्ये भारताचा पहिला सामना कॅनडाविरुद्ध, 11 ते 17 डिसेंबरदरम्यान स्पेनमध्ये होत आहे स्पर्धा

लुसानेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला हॉकी संघ डिसेंबरमध्ये होणाऱ्या नेशन्स कपमध्ये कॅनडाविरुद्ध मोहिमेची सुरुवात करणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनद्वारे (एफआयएच) आयोजित ही स्पर्धा ११ ते १७ डिसेंबर दरम्यान स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे होणार आहे.

आठ देशांमधील सात दिवसांच्या स्पर्धेसाठी संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारत, कॅनडा, जपान आणि दक्षिण आफ्रिका हे गट अ गटात आहेत. कोरिया, इटली, यजमान स्पेन आणि आयर्लंड ब गटात आहेत. कॅनडानंतर भारतीय संघ १२ डिसेंबरला जपानशी आणि १४ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करतील.

स्पर्धेचा अंतिम सामना १७ डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाची नुकतीच कामगिरी चांगली झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहून बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संघाने कांस्यपदक जिंकले. एफआयएच हॉकी प्रो लीगमध्येही संघाने तिसरे स्थान पटकावले.

बातम्या आणखी आहेत...