आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India's Golden Hat trick In Weightlifting; Anchita Shewli Gold Medalist In Weightlifting Followed By Jeremy, Mirabaipatha

राष्ट्रकुल स्पर्धा:भारताची वेटलिफ्टिंगमध्ये गाेल्डन हॅट््ट्रिक; जेरेमी, मीराबाईपाठाेपाठ अंचिता सुवर्णपदक विजेता

बर्मिंगहॅम14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्युदाे : सुशीलाला राैप्य, विजय यादवला कांस्य

गत चॅम्पियन मीराबाई, जेरेमीपाठाेपाठ २० वर्षीय वेटलिफ्टर अंचिता शेउलीने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून गाेल्डन हॅट््ट्रिक साजरी केली. त्याने ७३ किलाे वजन गटामध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. यादरम्यान त्याने गेम्स रेकाॅर्डचीही नाेंद केली. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकाची हॅट््ट्रिक करताना तीन गेम्स रेकाॅर्डलाही गवसणी घातली. या तिघांच्याही नावे या विक्रमाची नाेंद झाली आहे. यासह भारताला वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई करता आली. यासह भारताच्या नावे आता एकूण सहा पदकांची नाेंद झाली. ही सहाही पदके याच इव्हेंटमधून मिळाली आहेत. सुशीलादेवी आणि विजय यादवने साेमवारी ज्युदाे खेळ प्रकारामध्ये पदके जिंकली. सुशीलाने महिलांच्या ४८ किलाे वजन गटात राैप्यपदक जिंकली. विजय यादव हा ६० किलाे वजन गटात कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

बीडचा अविनाश साबळे, श्रीशंकर आजपासून ट्रॅकवर
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चाेप्राने दुखापतीमुळे माघार घेतली. मात्र, आता अॅथलेटिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्यासाठी मंगळवारी भालाफेकपटू अन्नू राणी, लाँग जंपर श्रीशंकर, लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे, थाळीफेकपटू सीमा पुनिया आजपासून आपले काैशल्य पणास लावणार अहेत. यांच्याकडून भारताला पदकाची आशा आहे. बीडच्या धावपटू अविनाशने नुकत्याच युजीन येथे झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नाेंदवला हाेता. ताे पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात दहाव्या स्थानी राहिला.

लाॅन बाॅलमध्ये भारताला पहिल्यांदाच पदक; महिला टीमला आता सुवर्णसंधी लवली चाैबे, पिंकी नयनमणी, रूपाने उल्लेखनीय कामगिरीतून भारतीय संघाचे लाॅन बाॅल प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेतील एेतिहासिक पदक निश्चित केले. भारताच्या या महिला संघाने उपांत्य सामन्यात सनसनाटी विजयाची नाेंद केली. भारताने लढतीत न्यूझीलंडचा १६-१३ ने पराभव केला. भारतीय महिला संघाला फायनलमधील आपला प्रवेश निश्चित करता आला. आता भारतीय महिला संघाला या इव्हेंटमध्ये चॅम्पियन हाेण्याची सुवर्णसंधी आहे. भारताचा सुवर्णपदकासाठीचा सामना आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाेणार आहे. यादरम्यान भारताचा पुुरुष संघ याच इव्हेंटमध्ये अपयशी ठरला.

बाॅक्सिंग : अमित पंघाल उपांत्यपूर्व फेरीत; पदकाचा दावा अधिक मजबूत
वर्ल्ड चॅम्पियनशिपधील राैप्यपदक विजेत्या बाॅक्सर अमित पंघालने साेमवारी ५१ वजन गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यासह त्याने आपला पदकाचा दावा मजबूत केला. त्याने लढतीत वानुआतूच्या नामरी बेरीचा पराभव केला. अमितने एकतर्फी विजयासह अंतिम आठमधील प्रवेश निश्चित केला. भारताच्या ऑलिम्पियन जलतरणपटू साजन प्रकाशची १०० मीटर बटरफ्लाॅय इव्हेंटमधील पदकाचे स्वप्न भंगले. त्याला उपांत्य फेरीचा पल्ला गाठता आला नाही.

स्क्वाॅश : सुनयना १२ मिनिटांत उपांत्य फेरीत; श्रीलंकेच्या चनिथमाचा पराभव
भारताच्या सुनयना सना कुरुविलाने स्क्वाॅश प्रकारात शानदार विजय संपादन केला. तिने महिलांच्या गटात १२ मिनिटांत उपांत्य फेरीत गाठली. तिने उपांत्यपूर्व फेरीत केला. तिने ११-३, ११-२, ११-२ ने सामना जिंकला. यासह तिला पुढची फेरी गाठता आली. बॅडमिंटन संघाने विजयी माेहीम कायम ठेवताना उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. भारतीय संघाने उपांत्यपूर्व सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

हाॅकी : आज रंगणार भारत-इंग्लंड सामना सलगच्या दाेन विजयांनी फाॅर्मात असलेला भारतीय महिला हाॅकी संघ आता तिसरा सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी सविताच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाला आज इंग्लंडच्या आव्हानाचा सामना करावा लागला. या सामन्यात इंग्लंडचे पारडे जड मानले जाते. मात्र, सध्या सलगच्या दाेन विजयाने भारतीय महिला संघ फाॅर्मात आहे.

बीडचा अविनाश साबळे, श्रीशंकर आजपासून ट्रॅकवर
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चाेप्राने दुखापतीमुळे माघार घेतली. मात्र, आता अॅथलेटिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्यासाठी मंगळवारी भालाफेकपटू अन्नू राणी, लाँग जंपर श्रीशंकर, लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे, थाळीफेकपटू सीमा पुनिया आजपासून आपले काैशल्य पणास लावणार अहेत. यांच्याकडून भारताला पदकाची आशा आहे. बीडच्या धावपटू अविनाशने नुकत्याच युजीन येथे झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नाेंदवला हाेता. ताे पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात दहाव्या स्थानी राहिला.

बातम्या आणखी आहेत...