आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन हा जगातला 1 नंबरचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने बुधवारी 1 मार्चला रँकिंग जाहीर केली. यामध्ये अश्विनने अव्वल स्थान पटकावंत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकले आहे.
अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. एका डावात त्याने 6 विकेट्स (3/57 आणि 3/59) घेतल्या. वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर अँडरसनची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. 36 वर्षीय अश्विनने 2015 मध्ये प्रथम क्रमांक-1 कसोटी गोलंदाज होण्याचा मान मिळवला होता. यानंतर त्याने अनेकवेळा अव्वल स्थान मिळवले आहे.
अश्विनने दिल्लीमध्ये देखील भारताच्या विजयात महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून अश्विनला नंबर-1 मजबूत करण्याची संधी आहे. अश्विनचे सध्या 864 रेटिंग गुण आहेत, तर जेम्स अँडरसनचे 859 रेटिंग गुण आहेत.
ऑलराउंडर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे. तर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा आठव्या स्थानावर आहे. तर भारताचा प्रमुख वेगावन गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे.
इंदूरची खेळपट्टी बनली भारतीय फलंदाजांसाठी कोडे
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखून विजय मिळवला, मात्र तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या तासात टीम इंडियाची आघाडीची फलंदाजी गडगडली, त्यानंतर खेळपट्टी पाहुन चाहत्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीवर सामन्याच्या पहिल्याच तासात विकेटवर इतके टर्न पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.