आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेलकात्यातील सुपरस्टार फुटबाॅलपटू माे. सलीम यांनी आपल्या शैलीपूर्ण खेळीतून स्वातत्र्यांपूर्वी जागतिक स्तरावर आपली छाप पाडली हाेती. त्यांनी १९३४ मध्ये देशातर्गंत माेहम्मडन स्पाेर्टिंग क्लबकडून फुटबाॅलमध्ये पदार्पण केले. त्यांनी प्रचंड मेहनतीमधून अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावला. त्यांची सामन्यागणिक खेळी ही लक्षवेधी असायची. याचाच प्रत्यय १९३६ मध्ये भारत दाैऱ्यावर असलेल्या चीन संघाला आला. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिस्पर्धी चीन टीमच्या खेळाडूंनीही काैतुकाचा वर्षाव केला. मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वीच ते बेपत्ता असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे ठिकठिकाणी त्यांचे हरवल्याचे पाेस्टर लावण्यात आले. नंतर वेगळीच माहिती समाेर आली. सलीम हे स्काॅटिश क्लब सेल्टिक एफसीसाठी ट्रायल देण्यासाठी गेले हाेते. त्यांनी ग्लासगाेत सेल्टिक क्लबसाठी ४ गाेल केले हाेते. त्यांच्या नावाचा भारतीय जादूगार म्हणून स्थानिक वृत्तपत्रांमध्ये खास उल्लेख करण्यात आला. सेल्टिक क्लबने थेट सलीम यांना जवळपास १ लाख ७२ हजारांची ऑफर दिली हाेती. मात्र, सलीम यांनी ही ऑफर धुडकावून लावली. त्यांनी दाेन सामन्यांदरम्यान खेळण्याची मिळालेली रक्कमही गाेर-गरिबांना दान केली.
अविस्मरणीय : देशाला पहिले यजमानपद
१९५१ मध्ये भारताने पहिल्यांदाच मेज स्पर्धेचे यजमानपद भूषवले. भारतात पहिल्या एशियन गेम्सचे आयाेजन करण्यात आले. यात ११ देशांचे ४८९ खेळाडू सहभागी हाेते. भारताने यात ५१ पदके जिंकली.
७५ वर्षांतील अविस्मरणीय माेहिमा - भारताने १९६२ एशियन गेम्समध्ये काेरियाचा १-० ने पराभव करून सुवर्ण जिंकले. भारताचे आशियात फुटबाॅलचे शेवटचे सुवर्ण ठरले. - भारताने १९६४ मध्ये पाकवर १-० ने मात करत सुवर्ण जिंकले. भारताचे हे हाॅकीतील सातवे ऑलिम्पिक सुवर्णपदक ठरले. - १९६५ मध्ये भारताने पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केले. अवतार सिंगच्या नेतृृत्वात ९ जणांनी ही माेहीम तिसऱ्या प्रयत्नात फत्ते केली. - भारताने १९६८ मध्ये विदेश दाैऱ्यावर पहिला कसाेटी मालिका विजय संपादन केला. मन्सूर यांच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर ३-१ ने मात - कमलजित संधूने १९७० एशियन गेम्समध्ये ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले हाेते. ती पहिली भारतीय महिला ठरली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.