आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India's Second Consecutive Victory, The Second Consecutive Victory In The 5 a side Hockey Tournament For The First Time

हॉकी:भारताचा सलग दुसरा विजय, पहिल्यांदाच आयोजित 5-ए साइड हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नाेंद ​​​​​​​  लुसाने

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारतीय पुरुष संघाने पहिल्यांदाच आयोजित ५-ए साइड हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. भारतीय संघाने रविवारी सामन्यामध्ये मलेशियावर ७-३ ने दणदणीत विजय संपादन केला. या धडाकेबाज विजयासह भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी धडक मारली. दुसरीकडे मलेशिया टीमला तीन सामन्यात दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

भारतीय संघाने गत सामन्यात यजमान स्वित्झर्लंडचा पराभव केला होता. तसेच भारताचा याच स्पर्धेतील पाकविरुद्धचा सामना २-२ ने बरोबरीत राहिला होता. मात्र, त्यानंतर भारताने सलग दोन सामने जिंकले. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर ५-ए साइड हॉकी स्पर्धेचे अायोजन करण्यात आहे. एफआयएचने २०१३ मध्येच या फॉरमॅटच्या स्पर्धा आयोजनाला मान्यता दिली. मात्र, त्यानंतर आता सीनियर संघांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...