आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India's Second Win Against A Defending Champion In 125 Years; India Beat Argentina 3 1; Reached The Semifinals With A Win; Fighting Japan Today; News And Live Updates

हॉकी:भारताचा 125 वर्षांत गत चॅम्पियनविरुद्ध दुसरा विजय; भारताची अर्जेंटिनावर 3-1 ने मात; विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली; आज जपानशी लढत

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता वरुण कुमार, विवेक, हरमनप्रीतचा प्रत्येक एक गोल
  • 1964 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा केला होता पराभव

मनप्रीतच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय हाॅकी पुरुष संघाने गुरुवारी टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेत सनसनाटी विजयाची नाेंद केली. भारताने गटातील सामन्यात गत चॅम्पियन अर्जेंटिनाला धूळ चारली. भारतीय संघाने ३-१ अशा फरकाने सामना जिंकला. वरुण (४३ वा मि.), विवेक सागर (५८ वा मि.) अाणि हरमनप्रीत (५९ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून भारतीय संघाचा क्वार्टर फायनलमधील प्रवेश निश्चित केला.

गत १२५ वर्षांत भारतीय संघाला गतविजेत्या संघाविरुद्ध दुसरा विजय साकारता अाला. अाज भारताचा सामना यजमान जपानशी हाेणार अाहे. धडाकेबाज विजयासह भारतीय संघाने पदकाचा दावा मजबूत केला. अर्जेंटिना टीमला शेवटच्या मिनिटांपर्यंत बराेबरी साधता अाली नाही. टीमला एकच गाेल करता अाला. भारताच्या गाेलरक्षक श्रीजेशने अर्जेटिनाचे गाेलचे प्रयत्न अपयशी ठरवले.

गाेलकीपिंग सर्वाेत्तम; अाता नाॅकअाऊट सामन्यादरम्यान दर्जेदार डिफेन्स गरजेचा
गत चॅम्पियन अर्जेंटिना संघाविरुद्ध विजयात वरुण, सागर अाणि हरमनप्रीत यांच्यासह गाेलरक्षक पी. अार. श्रीजेशचेही माेलाचे याेगदान अाहे. त्याने बलाढ्य टीमविरुद्ध सर्वाेत्तम गाेलकीपिंग केली. त्यामुळेच अर्जेंटिनाचा गाेल करण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. नाॅकअाऊट सामन्यांमध्ये भारतीय संघाला डिफेन्सचा दर्जा उंचावण्याची गरज अाहे.

यामध्ये संघाची बाजू काहीशी दुबळी अाहे. अाता थेट क्वार्टर फायनल गाठण्याची माेठी संधी अाहे. यासाठी जपानपाठाेपाठच जर्मनी, इंग्लंड अाणि हाॅलंडसारख्या बलाढ्य टीमविरुद्ध सामना हाेऊ शकेल. या संघाविरुद्ध डिफेन्सही महत्त्वाचा अाहे. यातून प्रतिस्पर्धीला गाेल करण्याची संधी मिळणार नाही. जपानविरुद्ध टीमचा विजयाचा दावा मजबूत अाहे. यजमान जपानच्या कामगिरीचा दर्जा घसरला.

दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवणार : मनप्रीत
अर्जेंटिनाविरुद्ध विजय हा निश्चितपणे टीमच्या खेळाडूंचा अात्मविश्वास द्विगुणित करणारा ठरला. अाता अाम्हाला आगामी सामन्यात जपानच्या अाव्हानाला सामोरे जावे लागणार अाहे. त्यामुळे दर्जेदार खेळीत सातत्य ठेवत अाम्ही पदकाचा पल्ला गाठणार अाहाेत अशा शब्दांत कर्णधार मनप्रीत सिंगने विजयाचा अानंद व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...