आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India's Series Win; Rahit Sharma Rahul's Record 15th Partnership, India Lead 2 0

भारताचा मालिका विजय:राेहित शर्मा-राहुलची विक्रमी 15 व्यांदा भागीदारी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-0 ने आघाडी

गुवाहाटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर लाेकेश राहुल (५७) आणि सूर्यकुमार यादवच्या (६१) झंझावातीच्या खेळीच्या बळावर टीम इंिडयाने रविवारी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय संपादन केला. भारताने दुसऱ्या निर्णायक टी-२० सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेेचा पराभव केल. भारताने १६ धावांनी निर्णायक दुसरा टी-२० सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. आता मालिकेतील तिसरा सामना उद्या मंगळवारी इंदूरच्या मैदानावर रंगणार आहे.

यासह यजमान टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना तीन गड्यांच्या माेबदल्यात २३७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित २० षटकांत ३ गड्यांच्या माेबदल्यात २२१ धावा काढल्या. टीमकडून डिकाॅक (६९) आणि मिलरची (१०६) नाबाद खेळी व्यर्थ ठरली. त्यांना आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. या दाेघांनी माेठी भागिदारी रचली. भारताकडून अर्शदीपने २ आणि अक्षरने १ बळी घेतला. भारताच्या विजयात कर्णधार राेहित शर्मा (४३) आणि विराट काेहली (नाबाद ४९) यांचेही माेलाचे याेगदान राहिले. भारताकडून सूर्यकुमारने १८ चेंडूंत दुसरे वेगवान अर्धशतक साजरे केले.

राेहितच्या नेतृत्वात ११ वा मालिका विजय; काेहलीला टाकले मागे

राेहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग ११ वा मालिका विजय संपादन केला. यासह त्याने नेतृत्वात सर्वाधिक मालिका विजयामध्ये माजी कर्णधार विराट काेहलीला मागे टाकले. काेहलीच्या नेतृत्वात सलग १० मालिका विजय झाले. आता राेहितच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली.

बुमराह ४ आठवड्यांत हाेणार फिट

टीम इंडियाचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह आगामी चार आठवड्यांत पूर्णपणे फिट हाेणार आहे. त्याला विश्वचषकात सहभागी हाेण्याची संधी आहे. ताे सुरुवातीचे सामने मुकणार आहे

बातम्या आणखी आहेत...