आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India's Shami, Siraj Prepare For Test Championship From IPL; Practice At Duke Ball

आयपीएल:भारताच्या शमी, सिराजची आयपीएलमधून टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी; ड्यूक बाॅलवर सराव

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेलंदाज शमी आणि सिराज हे दाेघेही यंदाच्या १६ व्या सत्रातील आयपीएलमधून आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तयारी करत आहेत. यासाठी ते ड्युक बाॅलवर कसून सराव करताना दिसत आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने देण्यात आली. ७ जूनपासून भारत आणि अॅस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. यासाठी सध्या दाेन्ही संघांचे खेळाडू आयपीएलमधून कसून तयारी करत आहेत. बीसीसीआयने गाेलंदाज शमी, सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव यांना आयपीएलशिवाय आठवड्यात ३३ षटके गाेलंदाजीचा सराव करावा, असे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांना ड्युक बाॅलची सक्ती करण्यात आली. कारण, इंग्लंडमध्ये ही फायनल रंगणार आहे. या ठिकाणी ड्युक बाॅलचा वापर केला जाताे.