आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील क्रीडा साहित्याच्या बाजाराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. इनडोअर खेळातील साहित्य व जिम उघडल्याने देशातील क्रीडा बाजारात उत्साह दिसतोय. यूपीतील मीरत व पंजाबमधील जालंधर क्रीडा साहित्य उत्पादनात आशियात आघाडीवर आहे. जालंधरमध्ये देशातील ७० टक्के क्रीडा साहित्य बनवले जाते व मीरतमधून ४५ टक्के निर्यात होते. लॉकडाऊननंतर मीरतच्या बाजारात ३० टक्क्यांनी मागणी वाढली. कंपन्यांकडे इनडोअर खेळाच्या साहित्याची मागणी अधिक आहे. दुसरीकडे, जालंधरमध्ये मागणी ४५ टक्क्यांपर्यंत आली आहे. येथे छोट्या-मोठ्या ७०० कंपन्या सुरू झाल्या. सध्या देशभरात बाहेरील खेळांवर बंदी कायम आहे. त्यामुळे क्रिकेट साहित्याचा सर्वात मोठा बाजार बंद आहे.
सध्या मागणी स्थानिक स्तरावर
सध्या साहित्याची मागणी स्थानिक स्तरावर आहे. स्पोर्ट््स गुड्स मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्स्पोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष अजय महाजन म्हणाले की, “क्रीडा साहित्य उत्पादनासाठी वाईट काळ आहे. स्पर्धा होत नाहीत. प्रशिक्षण अकादमी सुरू झाल्या, मात्र शाळा-महाविद्यालये, दुकाने बंद आहेत. क्रीडा क्षेत्र लवकरच सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.’
देशातील ६५ टक्के क्रीडा साहित्य ब्रिटन, ऑस्ट्रेलियाला होते निर्यात
मीरत-जालंधरमधून ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आदी देशांत क्रीडा साहित्य निर्यात होते. मीरतच्या क्रीडा साहित्य व्यापाऱ्याने म्हटले की, आम्ही जेवढे उत्पादन करतो, त्यातील ४५ टक्के साहित्य निर्यात करतो. मात्र, सध्या केवळ स्थानिक मागणी पूर्ण केली जातेय. देशातील ६० टक्के क्रीडा साहित्य निर्यात होते. सध्या निर्यात बंद असल्याने एकट्या क्रिकेट साहित्याचे १५०० कोटी व कपडे बनवणाऱ्या कंपन्यांचे ५०० कोटींचे नुकसान झाले.
मीरतमध्ये १५० कंपन्यांमध्ये कामकाज झाले सुरूजालंधरमध्ये ७०० कंपन्या सुरू झाल्या. जे कामगार घरी गेले होते, ते पुन्हा परतत आहेत. जालंधरमध्ये जवळपास ४० ते ६० टक्के कामगार परतले. मात्र, येथे उत्पादन पूर्वीसारखे होत नाही. एका कंपनीत २० ते ३० हजार रग्बी चेंडू बनवले जात होते, तेथे सध्या हजार बनवले जातात. जालंधरमध्ये जवळपास ३१८ खेळांच्या साहित्याची निर्मिती हाेते.
मीरतमध्ये ८ जूननंतर लॉकडाऊन शिथिल झाले होते. त्यामुळे शहर व बाहेरील १५० पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये काम सुरू झाले. येथे गेल्या तीन महिन्यांपासून साहित्य बनवण्याचे काम ठप्प होते. मात्र, आता हळूहळू पुन्हा सुरुवात होत आहे. मात्र, दुसऱ्या राज्यात साहित्य पाठवले जात नसल्याने १२५ कोटींचे नुकसान झाले.
४० ते ६० टक्के कामगार परतलेजालंधरमध्ये ७०० कंपन्या सुरू झाल्या. जे कामगार घरी गेले होते, ते पुन्हा परतत आहेत. जालंधरमध्ये जवळपास ४० ते ६० टक्के कामगार परतले. मात्र, येथे उत्पादन पूर्वीसारखे होत नाही. एका कंपनीत २० ते ३० हजार रग्बी चेंडू बनवले जात होते, तेथे सध्या हजार बनवले जातात. जालंधरमध्ये जवळपास ३१८ खेळांच्या साहित्याची निर्मिती हाेते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.