आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडबल ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि ऑल इंग्लंड ओपनमधील उपविजेत्या लक्ष्य सेनचे इंडाेनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारताच्या या दाेन्ही खेळाडूंना आपापल्या गटाच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. थायलंडच्या रत्नाचाेक इंतानोनने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात चाैथ्या मानांकित सिंधूचा पराभव केला. तिने ३३ मिनिटांत २१-१२, २१-१० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यासह तिने सिंधूवर सलग पाचव्या विजयाची नोंद केली. सिंधू आणि इंतानोन यांच्यातील हा १३ वा सामना होता. सिंधूला २०१८ पासून अद्याप इंतानोनविरुद्ध एकही विजय संपादन करता आला नाही. सातव्या मानांकित लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला तैवानच्या चेनने पराभूत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.