आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑलिम्पिक डबल पदक विजेत्या सिंधूने आपली आगेकूच कायम ठेवताना गुरुवारी कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने अवघ्या ३७ मिनिटांत प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या आया ओहोरीचा पराभव केला. दुसरीकडे भारताच्या के. श्रीकांतने पुरुष एकेरीच्या गटातील आगेकूच कायम ठेवली. दरम्यान, विदर्भ कन्या मालविका बनसाेड आणि ऑल इंग्लंड स्पर्धेतील उपविजेत्या लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला.
तिसऱ्या मानांकित सिंधूने महिला एकेरीच्या सामन्यात ओराेहीविरुद्ध २१-१५, २१-१० अशा फरकाने सरळ दाेन गेममध्ये एकतर्फी विजय साकारला. यासह तिने करिअरमध्ये जपानच्या खेळाडूविरुद्ध सलग १२ वा विजय संपादन केला. सिंधूचा अंतिम आठचा सामना थायलंडच्या बुसाननशी होणार आहे. श्रीकांतने एकेरीच्या लढतीत मिशा जिल्बरमॅनला सरळ दाेन गेममध्ये धूळ चारली. त्याने २१-१८, २१-६ अशा फरकाने एकतर्फी विजय साकारला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.