आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Information About 6 Of The National Award Winning Players And Coaches Who Had To Struggle A Lot

मंडे पॉझिटिव्ह:राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे खेळाडू व प्रशिक्षकांपैकी 6 जणांची माहिती, ज्यांना खूप संघर्ष करावा लागला

गौरव मारवाह/शेखर झा/कृष्णकुमार पांडे | चंदीगड/रायपूूर/भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्येंद्रने स्वत:चा खर्च भागवण्यासाठी बदलल्या 6 नोकऱ्या, शिवाने भाड्याच्या स्लेजवर जिंकले आशियाई सुवर्ण; सुशयला मंदिरातून जीवनाचा मार्ग मिळाला

येत्या २९ ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडादिनी खेळाडू व प्रशिक्षकांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातील. यंदा ६८ जणांना पुरस्कार मिळणार आहेत. जवळपास सर्वांची वाटचाल संघर्षपूर्ण आहे. एमपीचा सत्येंद्रसिंग लोहिया तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार मिळवणारा पहिला जलतरणपटू बनला. ल्यूश स्टार शिवा केशवन व महाराष्ट्राचा दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधवला अर्जुन पुरस्कार, पॉवरलिफ्टर घडवणारे विजय मुनेश्वर यांना द्रोणाचार्य पुरस्कार आणि लक्खा सिंग, युपीच्या सत्यप्रकाश तिवारी यांना ध्यानचंद पुरस्कार मिळेल.

विजय भाईचंद्रा मुनेश्वर : आपल्या खर्चाने खेळाडूंना स्पर्धेसाठी पाठवतात

मुनेश्वर १९९५ पासून पॉवरलिफ्टर तयार करत आहेत. ते स्वखर्चाने खेळाडूंना स्पर्धेत पाठवतात. त्यांच्या नावाची ९ वेळा यापूर्वी शिफारस केली होती. ते स्वत: खेळाडूंसाठी प्रायोजक शोधून आणून खेळाडूंना स्पर्धेला पाठवत. अनेक वेळा अपयश आल्यानंतर त्यांची आई त्यांच्या वडिलांच्या पेन्शनचे पैसे मुलांना प्रायोजित करतात.

सत्यप्रकाश तिवारी : रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले

सत्यप्रकाश लहानपणी क्रिकेट खेळत होते. मात्र, १९८१ मध्ये रेल्वे अपघातात पाय गमावले. कॉलनीतील दिव्यांग जलतरणपटूच्या सल्ल्याने अॅथलेटिक्सची सुरुवात केली. स्पर्धाही खेळली, मात्र पदक जिंकले नाही. २००२ मध्ये बॅडमिंटन खेळणे सुरू केले. विश्वचषक, आशियाई स्पर्धेत सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्यपदके जिंकली. आता मुंबईत बॅडमिंटनपटूंना प्रशिक्षण देताहेत.

सुयश जाधव : भावाच्या लग्नात विजेच्या धक्क्याने हात गेले

दिव्यांग जलतरणपटू सुयशने २००४ मध्ये भावाच्या लग्नात विजेच्या धक्क्यामुळे हात गमावला. मंदिरात जीवनाचा मार्ग मिळाला. २००७ मध्ये एकदा मंदिर परिसरात त्याचे वडील व भाऊ पोहत होते. सुयशला जलतरण येत होते व त्याने पोहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २००९ मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकले. २०१६ रिअो पॅरालिम्पिकमध्ये सहभाग घेतला. आताही नियमित सराव करतोय.

लक्खासिंग : गॅस स्टेशनवर काम केले, टॅक्सी चालवली

बॉक्सिंग प्रशिक्षक लक्खा ५ वेळचा राष्ट्रीय चॅम्पियन राहिले आहे. ते १९९८ मध्ये अमेरिकन जागतिक सैनिकी बॉक्सिंग स्पर्धेसाठी गेले व तेथून परतले नाही. ते प्रो-बॉक्सिंगमध्ये करिअर करू इच्छित होते. मात्र, अमेरिकन सैन्यदलाने त्यांना पळकुटा जाहीर केले. त्यांनी कधी गॅस स्टेशन, कधी हॉटेलमध्ये काम केले. ८ वर्षांनी परतले ११ वर्षे टॅक्सी चालवली. २०१७ पासून रांचीत प्रशिक्षक बनले.

सत्येंद्रसिंग : १३ वर्षांच्या मेहनतीनंतर मिळाले फळ

लहानपणी चुकीच्या उपचारामुळे सत्येंद्र पायाने अधू झाला. त्याने जलतरणला आपली ताकद बनवली. इंग्लिश खाडी व कॅटरिना खाडी पोहण्याचा विक्रम केला. सत्येंद्र म्हणतो, “स्वत:चा खर्च भागवण्यासाठी फोटो स्टुडिओत काम केले, वडिलांसोबत मजुरी केली, सेल्समन बनला, क्लार्क-शिक्षक बनला. आता वित्त विभागात कार्यरत आहे.’ त्यांच्या यशामागे १३ वर्षांची मेहनत आहे.

शिवा केशवन : चॅरिटीतून ऑलिम्पिक खेळला, २२ वर्षे संघर्षानंतर पुरस्कार

१९९८ हिवाळी ऑलिम्पिकमध्ये शिवा वयाच्या १६ व्या वर्षी खेळला व तो या स्पर्धेत जगातील सर्वात युवा ऑलिम्पियन बनला होता. २०११ मध्ये त्याने भारताला पहिल्यांदा आशियाई ल्यूशचे सुवर्ण जिंकून दिले. हे पदक त्याने जपानच्या खेळाडूंची भाड्याने घेतलेल्या स्लेजवर मिळवले. गेल्या २२ वर्षांत या खेळात तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.